महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही न

विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना पडली एकटी..

महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. महाराष्ट्रात सद्या महायुतीचे सरकार आहे. त्यातच आता विधिमंडळ अधिवेशनात   शिवसेना पडली एकटी पडली असल्याचं पाहायला मिळालंय. मुंबई शहरात सद्या रस्त्याचे जोरदार काम सुरु आहेत. यावरून मात्र ठाकरे गट आणि भाजपाने आक्रमक पावित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या रस्त्याच्या कामाच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे. 

हेही वाचा: खोक्याच्या समर्थनार्थ पारधी समाजाचं आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री झाल्यानंतर रस्ते कामांबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती. ठाकरेंना शह देण्यासाठी आणि रस्त्यांची स्थिती चांगली करण्यासाठी त्यांनी मुंबईतील सगळे रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच पहिल्याच घोषणेवरुन एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सातत्याने होत आहे. 

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, मुंबईतील सर्व आमदारांनाही बैठकीला बोलवण्यात आले आहे. आजच्या बैठकीत रस्ते कामात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांसदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सातत्याने होत असल्याने एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर  विधिमंडळ अधिवेशनात   शिवसेना पडली एकटी पडली असल्याचं पाहायला मिळालंय. मुंबई शहरात सद्या रस्त्याचे जोरदार काम सुरु आहेत. यावरून मात्र ठाकरे गट आणि भाजपाने आक्रमक पावित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.