महाराष्ट्रात कधी कोणती राजकीय घडामोड घडेल सांगता

श्रीकांत शिंदेंकडून आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण

महाराष्ट्र: महाराष्ट्रात कधी कोणती राजकीय घडामोड घडेल सांगता येत नाही. त्यातच आता श्रीकांत शिंदेंकडून आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय. सर्व नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलं असून ठाकरे गटाच्या 10 आमदारांनाही स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलाय. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय परंतु  ठाकरेंचे आमदार स्नेहभोजनाला जाणार नसल्याची माहिती देखील समोर आलीय. सर्व नवनिर्वाचित आमदार प्रशिक्षणासाठी दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे श्रीकांत शिंदेंनी सर्व आमदारांना निमंत्रण दिलं असल्याचं समोर आलंय.  शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु असतानाच आता एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलंय. 

हेही वाचा: शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण; कर्ज फिटले

ठाकरे गटाचे आमदार स्नेहभोजनाला जाणार का? या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या आमदारांसोबत ठाकरे गटाच्या आमदारांनी एकत्र जेवण करणे, यामागे काही राजकीय डावपेच आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांनी हे निमंत्रण सौजन्याने नाकारले असल्याचे समजते.

नवनिर्वाचित आमदारांचा दिल्ली दौरा महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदार दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, विविध केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठीदेखील होणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच श्रीकांत शिंदेंनी स्नेहभोजनाचे आयोजन केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: उद्यापासून बारावीची परीक्षा; पाहा काय आहे नियोजन

ऑपरेशन टायगर सुरूच? सध्या शिवसेनेकडून "ऑपरेशन टायगर" सुरू असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच विरोधी पक्षाच्या आमदारांना आपल्या गटात आणण्यासाठी सत्ता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंचे स्नेहभोजन हे नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.