उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार

Uddhav Thackeray On Modi: 'सिंदूर कुठे गेला...त्याचं कोल्ड्रिंक्स झालं का?'; उद्धव ठाकरेंची मोदींवर सडकून टीका

 

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये म्हणाले की भ्रष्टाचारासाठी इंडिया आघाडी पुढे आली आहे. 70 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप तुम्हीच केला, त्यानंतर  तुम्हीच आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यानंतर अशोक चव्हाण बाजूला दिसले. मग कोण कोणाचं रक्षण करतंय. आम्ही घुसखोरांना घरात ठेवतोय का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला.

शेख हसीनाला तुम्ही आसरा दिला, आम्ही नाही दिला असा आरोपही त्यांनी मोदींवर केला. बांगलादेशींना विरोध केला आणि तिकडून पळून आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधानांना तुम्ही आसरा देताय आणि आम्हाला सांगताय घुसखोरांचे रक्षण करताय असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद आणि इतर पदे तुम्ही देतात असेही उद्धव यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: राजकीय वर्तुळात खळबळ! शरद पवार गटाच्या 'या' खासदाराने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कारण गुलदस्त्यात

उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे, त्यावरून ठाकरेंनी मोदींवर आणि एकंदर भाजपावर तोफ डागली. माझ्या धमन्यांमध्ये सळसळतं सिंदूर वाहतंय, असं मोदी म्हणाले होते, मग आता त्याचं कोल्ड ड्रिंक झालं का, अशा शब्दांत ठाकरेंनी हल्लाबोल केला.