सातबाऱ्यावरील सर्व मयत खातेदारांऐवजी वारसांची नावं

साताबारा संदर्भात महसूल विभागाचा अनोखा उपक्रम; साताबाऱ्यामध्ये काय बदल होणार?

मुंबई : सातबाऱ्यावरील सर्व मयत खातेदारांऐवजी वारसांची नावं नोंदवण्याची अनोखी मोहीम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढली आहे. 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचं उद्दिष्ट आहे. 

राज्यातील मयत सातबारा आता जिवंत होणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अनोखी मोहीम काढली आहे. यामध्ये सातबाऱ्यावरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहेत. 10  मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यात 'जिवंत सातबारा मोहीम' राबविण्याचे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. तहसिलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा : Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

कशी असेल 'जिवंत सातबारा मोहीम'?

1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील. न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून मयत खातेदारांची यादी तयार होणार आहे. 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसासंबंधित कागदपत्रं तलाठ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत. स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी वारस ठराव मंजूर करतील. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा. जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावे येतील. 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नव्या उपक्रमामुळे साताबाऱ्यावर वारसांची नावे येणार आहेत. मयत व्यक्तींची नावे आता हटवण्यात येणार आहेत. हे काम 10 मे पर्यंत करून राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे.