विजय वडेट्टीवार यांनी अतिरेकी मारल्याच्या दाव्यावर

Vijay Vadettiwar: 'हे खोटारडं सरकार ...; विजय वडेट्टीवारांच वादग्रस्त विधान

Vijay Vadettiwar: ऑपरेशन महादेव अंतर्गत केंद्र सरकारने  केलेल्या अतिरेकी विरोधी कारवाईबाबत विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. याआधी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी 'अतिरेकी मारले म्हणजे मेहरबानी केली का?' असे वादग्रस्त विधान करत सरकारवर टीकेची झोड उठवली . त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत खळबळजनक विधान केले आहे.

वडेट्टीवार यांनी म्हटले की, 'हे खोटारडं सरकार आहे. जोपर्यंत अधिकृतरित्या सैन्याकडून याची पुष्टी होत नाही, तोपर्यंत ह्या लबाड सरकारवर विश्वास ठेवता येत नाही.' त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अतिरेकी कारवाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकारच्या निर्णयांवर आणि ऑपरेशन महादेवसारख्या मोहिमांवर संशय व्यक्त केला जात आहे. अतिरेकी हल्ल्यांनंतर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवर विरोधकांचा विश्वास राहिलेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर वड्डेट्टीवार यांचे वक्तव्य म्हणजे सरकारच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रहार मानला जात आहे.

'>अतिरेकी मेले यावर काँग्रेसचा विश्वास नाही