अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?

धुळे: अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. त्यामुळे शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. भाजपाची प्रतिमा मलिन केल्याचाही ठपका त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंवर केलेले आरोप दमानियांना भोवले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

2016 मध्ये माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात दमानिया यांनी आरोप  केले होते. दमानिया यांनी खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बी डब्लु वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा: ओबीसी आरक्षणासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भुजबळांचं स्वागत

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने  वॉरंट जारी केले आहे. 2016 मध्ये माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध दमानिया यांनी आरोप केले होते. दमानिया यांनी खडसेंसह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला होता. डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान दमानिया उपस्थित राहिल्या नसल्याच्या कारणावरुन त्यांच्याविरोधात बी डब्लु वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

महाराष्ट्रातील घोटाळ्यांची पोलखोल करणाऱ्या अंजली दमानिया सध्या चर्चेत आहेत. दमानिया सातत्याने अनेक प्रकरणे बाहेर काढत असतात. यावेळी त्या अनेक नेत्यांवर आरोप करत असतात. 2016 मध्ये असाच आरोप त्यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात केला. शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. डॉ. मनोज महाजन यांनी भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्याविरोधात दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर नसल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्यांना वॉरंट जारी केले आहे.