आमदार नितेश राणे यांनी थेट प्रशासनाला धारेवर धरले.

निधी खर्च का होत नाही? नितेश राणे यांचा प्रशासनाला सवाल

सिंधुदुर्ग: जिल्हा नियोजन समितीच्या अलीकडच्या बैठकीमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले. आमदार नितेश राणे यांनी थेट प्रशासनाला धारेवर धरले. बैठकीच्या सुरुवातीला, आमदार नितेश राणे यांनी निधी खर्चाचा विषय उपस्थित केला. त्यासोबतच, त्यांनी प्रशासनाची कार्यशैली आणि निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. 

नितेश राणे यांनी प्रशासनाला धारेवर धरले:

'सरकारकडून निधी दिला जातो, मग तो वेळेवर खर्च का होत नाही? विकासकामे रखडत आहेत, सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो, आणि प्रशासन मात्र निष्क्रिय आहे', अशा कठोर शब्दांत आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला. त्यांच्या या सडेतोड प्रश्नांनी काही क्षणासाठी संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.

यावेळी, आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील वाढत्या अनधिकृत धंद्यांकडे लक्ष वेधले. 'सिंधुदुर्गमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि गायीच्या मांसाची अवैधरित्या तस्करी केली जात आहे', असा आरोप करत आमदार नितेश राणे यांनी पोलिस प्रशासनाची झाडाझडती घेतली. 'ड्रग्ज आणि मांसाची वाहतूक खुलेआम सुरू आहे. गांजाची शेती केली जाते. हे सगळं थांबवायला प्रशासन गंभीर दिसत नाही', असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारून कठोर पावले उचलण्याची सूचना दिली. 

इतर सदस्यांनी या मुद्यावर सहमती दिली:

या बैठकीमध्ये उपस्थित इतर सदस्यांनीदेखील या मुद्यावर सहमती दर्शवली आणि 'जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे', असं मत मांडलं. यावेळी काही सदस्यांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवण्याची मागणी केली, तर काहींनी जिल्ह्यातील तरुणांना ड्रग्जपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची सूचना केली. 

नितेश राणे यांची बैठकतील भूमिका आक्रमक:

सभागृहातील वातावरणावरून हे स्पष्ट झाले की बैठकीत नितेश राणे यांची भूमिका ठाम, आक्रमक आणि जनहिताची होती. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आणि विकासाच्या दृष्टीने निधीचा योग्य वापर व्हावा. त्यासोबतच, अनधिकृत धंद्यांना आळा बसावा या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता हे पाहावं लागेल की यानंतर प्रशासन कोणते महत्वपूर्ण पाऊल उचलते आणि जिल्ह्यातील या गंभीर समस्यांवर नेमके कोणते उपाय आणतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.