महाशिवरात्री हिंदू धर्मातील सण असून या दिवशी महादे

Mahashivratri 2025: या गोष्टींनी करा शिवलिंगावर अभिषेक! जाणून घ्या महत्व

महाशिवरात्री हिंदू धर्मातील सण असून या दिवशी महादेवांची विविधप्रकारे पूजा करतात. या दिवशी अनेक ठिकाणी महादेवांची भूत प्रेतांसोबत वरात सुद्धा निघते. असे म्हणतात की या दिवशी शिव - पार्वती यांचा विवाहदेखील झाला होता. त्यामुळे या दिवसाचे हिंदू धर्मांत विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक विविध शिवमंदिरात जाऊन महादेवांची नित्य-नेमाने पूजा करतात. महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाची पूजा करण्यासाठी अनेक भाविक विविध दुकानात जाऊन पूजेची सामग्री आणतात. जाणून घ्या शिवलिंगावर जलाभिषेक करताना कोण - कोणत्या सामग्रींची आवश्यकता पडेल. 

1 - शुद्ध जल: शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शुद्ध जल अर्पण करतात. याच शुद्ध जलाने शिवलिंगाला अभिषेक केले जाते. 

हेही वाचा: Mahashivratri 2025: तब्बल दीडशे वर्षानंतर महाशिवरात्रीला दुर्लभ योग; या राशींना मिळणार सर्व सुखं! बरसेल पैसाच पैसा!

2 - दूध: शिवलिंगाची पूजा करताना दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते.

3 - दही: शिवलिंगाच्या पूजेमध्ये दही अभिषेकालासुद्धा विशेष महत्त्व आहे. दही हे शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.

4: मध- शिवलिंगावर अभिषेक करताना मधाचे देखील वापर केले जाते. ज्यामुळे भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतो. 

हेही वाचा: Mahashivratri 2025: तब्बल दीडशे वर्षानंतर महाशिवरात्रीला दुर्लभ योग; या राशींना मिळणार सर्व सुखं! बरसेल पैसाच पैसा!

5 - बेलपत्र: महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय असल्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना त्यांना बेलपत्र अर्पण करतात. 

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)