Ganeshotsav 2025 : 'या' देशात आहे जगातील सर्वात उंच गणपतीची मूर्ती; जाणून घ्या
थायलंड: गणोशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भारतातील अनेक प्रसिद्ध गणपतीची मंदिरे आणि मनमोहक गणेशमूर्ती येतात. मुंबईत अनेक प्रसिद्ध गणपती आहेत, ज्याची उंची 18 फूट, 20 फूट ते अगदी 40 फूटांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला माहित आहे का, बाप्पाची सर्वात उंच गणेशमूर्ती कुठे आहे? चला तर जाणून घेऊया.
'या' ठिकाणी आहे गणपती बाप्पाची सर्वात उंच मूर्ती
गणपती बाप्पाची सर्वात उंच मूर्ती थायलंड देशातील खलोंग खुएन गणेश इंटरनॅशनल पार्क येथे आहे. माहितीनुसार, या मूर्तीची उंची 39 मीटर आहे. ही मूर्ती 2012 मध्ये साकारली गेली असून ही मूर्ती 854 कांस्य तुकड्यांपासून बनवली आहे. गणपती बाप्पाची ही उभी मूर्ती तब्बल चार वर्षांनंतर पूर्ण झाली. या गणेशमूर्तीला पाहण्यासाठी विविध देशांतून लाखो पर्यटक येतात. ही गणेशमूर्ती बंग पाकोंग नदीवर उभी आहे आणि 40,000 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. गणरायाच्या चारही हातांत ऊस, फणस, केळी आणि आंबे आहेत. मान्यतेनुसार, हे सर्व विकास आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे.
'या' वेळेत तुम्ही गणपती बाप्पाच्या सर्वात उंच मूर्तीचे दर्शन घेऊ शकता
सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाच्या सर्वात उंच मूर्तीचे दर्शन घेऊ शकता.
पत्ता: 2 मू 4, बंगतळाद, खलोंग खुएन, चाचोएंगसाओ, थायलंड.
प्रवेश शुल्क: विदेशी पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क 100THB प्रति व्यक्ती आहे आणि थायलंडमधील नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
थायलंडमधील सर्वात उंच गणेशमूर्ती पाहण्यासाठी 'हा' आहे सर्वोत्तम वेळ
थायलंडमधील सर्वात उंच गणेशमूर्ती पाहण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिना सर्वोत्तम आहे.