Importance Of Donation: मंदिरात 'या' 6 गोष्टी दान करा, संकटं टळतील आणि सुख-समृद्धी लाभेल
Importance Of Donation: सनातन धर्मात मंदिराला केवळ उपासनेसाठी पवित्र स्थान मानले जात नाही तर तिथे केलेल्या दानालाही विशेष महत्व दिले गेले आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की देवाच्या दरबारात श्रद्धेने दिलेले छोटेसे दानदेखील मोठे पुण्य देते. असे मानले जाते की विशिष्ट वस्तूंचे मंदिरात दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. चला जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या वस्तूंबद्दल.
1) कलशाचे दान
कलश हा शुभत्व आणि मंगलाचे प्रतीक मानला जातो. मंदिरात कलश दान केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो, नोकरी-व्यवसायात नवनवीन संधी मिळतात आणि भाग्याची साथ मिळते. ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येतात त्यांच्यासाठी कलश दान अत्यंत फलदायी ठरते.
2) लाल ध्वज
लाल रंग शक्ती आणि उत्साहाचा द्योतक आहे. मंदिरात लाल ध्वज दान करणे म्हणजे जीवनात मान-सन्मान आणि कीर्ती प्राप्त करणे. विशेष म्हणजे ध्वज मंदिरात स्वतः लावल्यास त्याचे पुण्य अधिक वाढते. यामुळे सामाजिक प्रतिष्ठाही वाढते. हेही वाचा: Parivartini Ekadashi 2025: परिवर्तिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताचे महत्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
3) दीपदान
प्राचीन काळापासून दीपदानाला विशेष महत्व आहे. दीपक हे अंधःकार दूर करून प्रकाश देण्याचे प्रतीक आहे. जीवनात आर्थिक संकट, घरातील कलह-क्लेश किंवा नकारात्मकता असेल तर मंदिरात दीपदान करावे. यामुळे जीवनातील अंधःकार नाहीसा होऊन सकारात्मक उर्जा निर्माण होते.
4) माचिसचे दान
माचिस ही लहानशी वस्तू असली तरी तिचा उपयोग मोठा आहे. मंदिरात माचिस दान केल्याने ज्यांचे मंगळ ग्रह अशुभ असतात त्यांना लाभ होतो. तसेच आर्थिक अडचणी दूर होऊन स्थैर्य येते.
5) कपूर दान
कपूर हे पवित्रतेचे प्रतीक आहे. मंदिरात कपूर दान केल्याने शरीर आणि मन निरोगी राहते. मानसिक तणाव, अस्वस्थता किंवा रोग यांपासून मुक्ती मिळते. धार्मिक दृष्टिकोनातून कपूर दान जीवनात चांगले परिणाम घडवून आणते.
6) छत्री दान
छत्री म्हणजे संरक्षणाचे चिन्ह. मंदिरात छत्री दान केल्याने व्यवसायात लाभ होतो आणि आर्थिक स्थिती स्थिर राहते. व्यापार-उद्योगात सतत प्रगती व्हावी यासाठी छत्रीचे दान शुभ मानले जाते.
मंदिरात केलेले हे दान केवळ धार्मिक कृती नसून जीवनातील समस्यांना दूर करून प्रगतीचा मार्ग खुला करण्याचे साधन आहे. श्रद्धा आणि भावनेने केलेले दान नेहमीच शुभ फळ देते. म्हणूनच या सहा वस्तूंचे मंदिरात दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि मानसिक समाधान लाभते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)