Masik Shivratri 2025: चैत्र महिन्याची मासिक शिवरात्री कधी असते? जाणून घ्या
मासिक शिवरात्रीचा उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी, शिव परिवाराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, मासिक शिवरात्रीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती प्राप्त होते आणि विवाहित महिलांचे सौभाग्य वाढते. त्यासोबतच, अविवाहित मुलींना चांगला वर मिळण्याचे आशीर्वाद मिळतात. मासिक शिवरात्रीला खास योगायोग होत आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री कोणत्या दिवशी साजरी केली जाईल.
हेही वाचा: महाराष्ट्रातील घरा-घरात येणारे वासुदेव अचानक दिसेनासे का झाले? जाणून घ्या कधी असेल चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री?
द्रीक पंचांग नुसार या वर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी गुरुवार, 27 मार्च रोजी रात्री 11:03 पासून सुरू होईल आणि शुक्रवार, 28 मार्च रोजी सायंकाळी 7:55 पर्यंत राहील. निशिता काळात या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व असल्याने 27 मार्च, गुरुवार रोजी मासिक शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
मासिक शिवरात्रीला दोन शुभ योग:
यावेळी मासिक शिवरात्रीला दोन शुभ योग तयार होत आहेत. सकाळी 9:25 पर्यंत साध्य योग राहील, जो यश आणि सिद्धी देणारा मानला जातो. यानंतर शुभ योग सुरू होईल, जो दुसऱ्या दिवशी 28 मार्च रोजी पहाटे 5:57 पर्यंत राहील. याशिवाय, दिवसभर शतभिषा नक्षत्र असेल, ज्याची समाप्ती दुपारी 12:34 वाजता होईल आणि त्यानंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल.
मासिक शिवरात्रीचे महत्त्व:
या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. महादेवांच्या कृपेने संकटे, रोग आणि दोष दूर होतात. खासकरून रात्री शिव मंत्रांचा जप केल्याने आध्यात्मिक लाभ होतो. याशिवाय, रुद्राभिषेक केल्याने शुभ फल प्राप्त होते.
मासिक शिवरात्रीला करा खालील मंत्रांचा जप:
ॐ नमो भगवते रुद्राय नमः
ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वारुकमिव बंधन मृत्य्योर्मुक्षीय मामृता ||
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रः प्रचोदयात्
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)