परंपरेनुसार, गणपती बाप्पाला त्यांचे आवडते पदार्थ अ

Ganesh Chaturthi Bhog List: यंदा गणेशोत्सवादरम्यान गणरायाला अर्पण करा 'या' 7 पदार्थांचा नैवेद्य; घरावर सदैव राहील बाप्पाची कृपादृष्टी!

Ganesh Chaturthi Bhog List: गणेश चतुर्थी हा दहा दिवस चालणारा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या पवित्र दिवसांत बाप्पांची पूजा विधीवत केली जाते आणि त्यांना विविध नैवेद्य अर्पण केले जातात. परंपरेनुसार, गणपती बाप्पाला त्यांचे आवडते पदार्थ अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. बाप्पाला नेमके कोणते पदार्थ आवडतात ते जाणून घेऊयात...

मोदक

मोदक हा गणेशजींचा सर्वात आवडता पदार्थ आहे. पुराणकथांनुसार, आई पार्वतीच्या हातचे मोदक बाप्पा आनंदाने खात असतं. म्हणूनच गणेश चतुर्थीला मोदक अर्पण करणे शुभ मानले जाते.

लाडू

मोदकानंतर लाडू हा बाप्पाचा आवडता भोग मानला जातो. बेसनाचे किंवा बुंदीचे लाडू बाप्पाला अर्पण केले की घरात आनंद आणि समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.

श्रीखंड

दही, साखर, केशर आणि सुका मेवा घालून तयार होणारे श्रीखंड गणेशजींना अत्यंत प्रिय आहे. विशेषतः पाचव्या दिवशी श्रीखंड अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.

नारळ

नारळाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. गणपतीला नारळ अर्पण केल्यास शुभ फल मिळते. नारळाला 'कल्पवृक्ष' असेही म्हणतात कारण त्यात त्रिदेवांचा वास असल्याचे मानले जाते.

हेही वाचा - Vastu Tips: घर, कामाच्या ठिकाणी जरूर काढावं स्वस्तिक; कोणत्या दिशेचे काय शुभ परिणाम मिळतात, जाणून घ्या..

पुरणपोळी

महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचे महत्त्व पुरणपोळीशिवाय अपूर्ण मानले जाते. बाप्पाला हा गोड पदार्थ अर्पण केल्याने घरात ऐश्वर्य व समाधान लाभते.

केळी

गणेशजींना केळी खूप प्रिय आहेत. कोणत्याही पूजेत केळी अर्पण करणे शुभ मानले जाते. गणपतीला केळी दिल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.

हेही वाचा - Pitru Paksha 2025: पितृपक्षापूर्वी 'या' गोष्टी घरातून बाहेर काढा अन्यथा...

तूप आणि गूळ

शुद्ध तूपात शिजवलेला गुळ बाप्पाला अर्पण करण्याची परंपरा आहे. यात नारळ, खजूर किंवा सुका मेवा मिसळून दिल्यास हा नैवेद्य अधिक विशेष होतो. गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांत हे सात पदार्थ बाप्पाला अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)