शनि साडेसाती हा सात अडीच वर्षांचा कालावधी असून तो

Shani Sade Sati: सध्या कोणत्या राशींवर आहे शनीची साडेसाती? जाणून घ्या सोपे पण प्रभावी उपाय

Shani Sade Sati: ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह हा न्यायाचा देव मानला जातो. मनुष्याच्या आयुष्यात त्याच्या कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह म्हणून शनि विशेष महत्त्वाचा आहे. शनीचा एक महत्त्वपूर्ण कालखंड म्हणजे साडेसाती. हा कालावधी साधारणपणे सात अडीच वर्षांचा असतो. या काळात शनि चंद्रराशीच्या बाराव्या, पहिल्या आणि दुसऱ्या भावातून भ्रमण करतो. त्यामुळे या कालखंडाला साडेसाती असे नाव देण्यात आले आहे.

सामान्य समजुतीनुसार साडेसाती म्हणजे फक्त संकटे, अडचणी आणि तोट्यांचा काळ. परंतु हे अर्धसत्य आहे. शनि हा कर्मफलदाता ग्रह असल्याने, जो व्यक्ती योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे आणि मेहनतीने जीवन जगतो त्याला या काळात यश, कीर्ती आणि प्रगती लाभू शकते. उलट चुकीचे कर्म करणाऱ्यांसाठी ही वेळ कठीण परीक्षा घेणारी ठरते. हेही वाचा: Weekly Horoscope 17 August To 23 August 2025: या आठवड्यात कोणाला मिळणार यश, तर कोणाला सावधानतेची गरज? वाचा साप्ताहिक राशीभविष्य सध्या कोणत्या राशींवर साडेसाती?

मेष राशी मेष राशीच्या जातकांवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. हा कालावधी 31 मे 2032 पर्यंत टिकणार आहे. या काळात महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक पावलं उचलणं आवश्यक आहे. विशेषतः आर्थिक आणि करिअरविषयक बाबतीत घाईगडबडीने निर्णय घेणे टाळावे.

मीन राशी मीन राशीचे लोक साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहेत. ही अवस्था 17 एप्रिल 2030 पर्यंत राहणार आहे. या काळात भावनिक चढ-उतार, मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन केल्यास परिस्थिती हळूहळू सुधारेल.

कुंभ राशी कुंभ राशीवरील साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. हा कालखंड 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत चालेल. करिअर, नोकरीत बदल आणि कौटुंबिक तणाव या राशीच्या लोकांना अनुभवायला मिळू शकतात. या काळात संयम, संयम आणि पुन्हा संयम हेच मुख्य शस्त्र आहे. हेही वाचा: Gajkesari Rajyog 2025: 18 ऑगस्टपासून 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, गुरु ग्रह देणार शक्तिशाली राजयोग आणि धनलाभ; जाणून घ्या साडेसातीचे उपाय काय?

ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीच्या काळात योग्य उपाय केल्यास नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात.

-शनिवारी शनि देवाची मनोभावे पूजा करावी. -पीपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा. -गरीब आणि गरजूंना काळे कपडे, लोखंडी भांडी, काळे चणे किंवा उडदाची डाळ दान करणे फलदायी ठरते. -शनिचालीसा वाचन, शनि मंत्रांचा जप नियमित करावा. -प्रत्येक शनिवारी तीळ, तेल आणि उडदाची डाळ दान करावी.

शनि साडेसाती हा काळ प्रत्येकासाठी आव्हानात्मक ठरतो. मात्र योग्य आचरण, संयम आणि श्रद्धेने हा काळ पार केल्यास तोच कालखंड प्रगती व यशाचा मार्गही दाखवतो. म्हणूनच भीती बाळगण्याऐवजी शनीला न्यायाधीश मानून योग्य कर्म करण्यावर भर दिल्यास साडेसातीही लाभदायी ठरू शकते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)