Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी 'या' तीन राशींवर असणार श्रीकृष्णाची विशेष कृपा; जाणून घ्या
Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस प्रत्येक भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा असतो. यंदा जन्माष्टमी 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही दुर्मीळ योगांचे संगम दिसून येणार आहेत. रात्री २ वाजेपर्यंत कर्क राशीत बुधादित्य योग राहणार आहे, तर सूर्य स्वतःच्या स्वराशीत प्रवेश करेल. त्याचप्रमाणे सकाळी चंद्र वृषभेत प्रवेश करेल, ज्यामुळे शुभ योगांचे वातावरण तयार होईल.
या विशेष योगांचा परिणाम काही राशींवर थेट दिसून येईल. विशेषतः कन्या, धनू आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत फळदायी ठरणार आहे.
कन्या (Virgo): कन्या राशीच्या लोकांसाठी या जन्माष्टमीचा दिवस सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. श्रीकृष्णाची विशेष कृपा तुम्हाला मिळणार आहे. कामात प्रगती होईल, व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील आणि अचानक आर्थिक लाभ देखील मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये आनंदाचे वातावरण असेल.
धनू (Sagittarius): धनू राशीच्या लोकांसाठी हा दिवस करिअरमध्ये झेप घेण्याचा आहे. जुनी अडचणीत कामे यशस्वी होतील, गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.
कुंभ (Aquarius): कुंभ राशीच्या लोकांसाठी नोकरी व व्यवसायात यश मिळेल. इच्छित नोकरीची संधी येईल, बढतीसाठी योग आहेत आणि मोठ्या व्यावसायिक डील्सही पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नव्या प्रकल्पांना भरपूर साथ मिळेल.
यंदाची जन्माष्टमी फक्त धार्मिक उत्सव नाही तर या तीन राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणारा दिवस ठरणार आहे. श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीने तुमच्या घरात एकाच वेळी सुख, समाधान आणि संपत्तीची भरभराट होईल. दही-साखरेच्या प्रसादासह नशीब देखील चमकणार आहे. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.