तुमच्या मनाला व्यापून टाकलेले दुःख काढून टाका. त्य

Today's Horoscope: 'या' राशीसाठी आजचा दिवस खर्चीक; जाणून घ्या

मुंबई: मेष: तुमच्या मनाला व्यापून टाकलेले दुःख काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. कुटुंबात वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला आहे.

वृषभ: आज व्यापाऱ्यांना घाटा होण्याची शक्यता आहे. यासह, आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा. मात्र, मुलांसोबत अधिक गोडीगुलाबीने, उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. रिकाम्या वेळेत तुम्ही आज काही खेळ खेळू शकतात. मात्र, तेव्हा दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.

मिथुन: तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज पैसे तुमच्या हाताता टिकणार नाही. त्यामुळे, आज पैसे जमा करण्यात तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. लांब राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आजचा दिवस आनंदाचा ठरेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्याने तुमच्या मनावर दबाव येईल. नवी भागीदारी आज समाधानकारक असेल. आज तुम्हाला धर्मादाय आणि सामाजिक कामाचे आकर्षण वाटू शकते. 

कर्क: आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबाबत तक्रारी करुन किंवा उदास होण्यात काहीही अर्थ नाही. असे निराशाजनक विचार जगण्याचा आनंद, जीवनातील आशा आणि अपेक्षा नष्ट करतात. जे लोक परदेशात व्यापार करतात, आज त्यांना धनलाभ होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रमंडळीसोबत भरपूर वेळ घालवता येईल. तुमच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने तुमच्याकडे अत्यंत उत्तम संधी चालून येतील. आयटी व्यावसायिकांसाठी परदेशातून नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्यांपासून लांब रहा. तसेच, लोकांसोबत वाद करणे टाळा.

सिंह: तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आज तुमच्या शेजारचे तुमच्याकडे पैसे उधार घेण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे, त्यांना किंवा कोणालाही पैसे देण्यापूर्वी खूप विचार करा, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामात लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील, जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. 

कन्या: अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. जर तुम्ही विवाहित असाल तर, आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. अन्यथा तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो.  चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण त्यापूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. 

तूळ: फूट पाडणारे विचार भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. तुमचे प्रतिगामी विचार आणि जुने संकल्पना तुमच्या प्रगतीला हानिकारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडथळे निर्माण होतील. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. दिवसाची सुरुवात जरी कंटाळवाणे असेल, तरी भविष्यात तुम्हाला चांगले फळ मिळतील. 

वृश्चिक: तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे, हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. आज तुम्ही उजळ बाजूकडे पाहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल कराल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक करणे टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षणांचा अनुभव घ्या. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अडथळे येत असतील, तर आजचा दिवस चांगला आहे. 

धनु: आरोग्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागेल. रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे आणि इतरांवर खर्च करणे टाळा. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील.

मकर: आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व प्रकारच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे सतत सकारात्मक विचार करा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. सायंकाळी अचानक पाहुणे घरात आल्याने गर्दी होईल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

कुंभ: आपल्यासाठी काय चांगले आहे आणि काय नाही, हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. लक्षात ठेवा की तुमची संचित केलेली संपत्ती तुमच्या दुःखाच्या वेळी कामी येईल, म्हणून आजच संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या योजनांबद्दल इतरांना सांगणे टाळा, अन्यथा तुमचा प्रकल्प रखडेल. कोणत्याही नवीन कामासाठी, आजच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी बोला. जर आज तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम सुरू करणार आहात, त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी भेटा.

मीन: शाररीक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता कमी आहे. आपल्या ओळखीत असलेल्या लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मुलांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे आणि त्यांना काही चांगली मूल्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी सांगण्याची गरज आहे. चुकीचा संदेश पाठवणे किंवा चुकीचे संभाषण करणे तुमचा दिवस खराब करू शकते. तुमच्यात खूप काही साध्य करण्याची क्षमता आहे. म्हणून तुमच्याकडे येणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. 

(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)