Shikhar Dhawan : शिखर धवनसोबतची 'ती' गॉगलवाली तरुणी कोण?, सोशल मीडियावर चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव करत मोहिमेची विजयी सुरूवात केली. या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक मारा करत 5 विकेट्स घेतल्या. तर शुभमन गिलने जबरदस्त फलंदाजी करत 101 धावांची शतकी खेळी साकारली. बांगलादेशने विजयासाठी दिलेले 229 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले. या सामन्यात एक वेगळाच प्रसंग सद्या चर्चेचा विषय ठरला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ब्रँड ॲम्बेसेडर असलेला शिखर धवन स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आला होता. तेव्हा त्याच्या बाजूला एका परदेशी तरुणी बसली होती. या तरुणीबद्दल चर्चा रंगू लागली. कारण काही महिन्यांपूर्वीही शिखर धवन एका विदेशी महिलेसोबत विमानतळावर दिसला होता.
धवनच्या बाजूला बसलेली ती कोण? शिखर धवनच्या बाजूला बसलेली ही महिला कोण? याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. काहींनी त्या तरूणीचे नाव शोधण्यास सुरूवात केली. अखेर माहिती समोर आली की ही तरुणी सोफी आहे. जिला धवन इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. त्यामुळे दोघांमध्ये मैत्री असल्याचं स्पष्ट झाले. पण हे फक्त मैत्री आहे की त्यापेक्षा अधिक काही याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
शिखर धवनने याआधी 2012 मध्ये आयशा मुखर्जीशी लग्न केले होते. आयशा त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती आणि आधीच दोन मुलांची आई होती. मात्र, काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि शेवटी दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर धवन अनेकदा आपल्या मुलापासून दूर राहण्याच्या विरहाबद्दल बोलताना दिसला आहे. त्याचा मुलगा सध्या ऑस्ट्रेलियात आपल्या आईसोबत राहत आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तान भारताला हरवणार' IITian बाबाचं भाकीत
शिखर धवन सध्या क्रिकेटपासून काहीसा लांब आहे. पण तो सोशल मीडियावर अक्टिव्ह असतो. अनेकदा मजेशीर आणि प्रोत्साहनपर पोस्ट तो शेअर करत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चाही वारंवार होते. काही महिन्यांपूर्वी तो एका परदेशी तरुणीसोबत विमानतळावर दिसला होता. आता स्टेडियममध्ये सोफीसोबत दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.