CSKच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक

CSK on Ravichandran Ashwin : अश्विनच्या आरोपांवर CSK चं उत्तर , म्हणाले, 'दावे खोटे आणि...'

मुंबई: चेन्नई सुपर किंग्जच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक दावा केला आहे. अश्विन म्हणाला की, 'आयपीएल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेविसला टीममध्ये घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे खूप पैसे दिले'. या वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनने केलेल्या आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला उत्तर द्यावं लागलं. 

हेही वाचा: Sanjay Raut: 'शिंदेंचा मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो'; संजय राऊतांचा घणाघात

चैन्नई सुपर किंग्जचे स्पष्टीकरण

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करून अश्विनचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले. यासह, ते म्हणाले की, 'आयपीएल प्लेयर नियमावली 2025-2027 च्या क्लॉज 6.6 प्रमाणे रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून करार केला होता. ब्रेविसला नियमाप्रमाणे संघात घेतले आहे, हे चेन्नई सुपर किंग्ज स्पष्ट करू इच्छिते'. 

नेमकं प्रकरण काय?

गुरजपनीत सिंहची जागा घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला एका खेळाडूची आवश्यकता होती. मागील आपपीएलमध्ये त्याची जागा ब्रेविसने घेतली होती. इतकंच नाही, तर अश्विनच्या म्हणण्यानुसार, अनेक टीम्सने दक्षिण आफ्रिकेच्या या युवा फलंदाजाला स्वत:च्या पक्षात घेण्यास आतुर होते. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने ब्रेविसला खूप पैसे देऊन खरेदी केले. त्यामुळे, या कराराला सोशल मीडियावर 'फ्रॉड डील' असं देखील म्हणाले. 

हेही वाचा: Flight Colour: विमानं प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचीच का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

अश्विन काय म्हणाला होता?

'आयपीएलचा दुसरा हंगाम ब्रेविससाठी चांगला गेला होता. त्यामुळे, ब्रेविसला संघात घेण्यासाठी दोन-तीन टीम उत्साही होते. मात्र, तेव्हा ब्रेविसला स्वत:च्या टीममध्ये घेण्यासाठी कोणीही पैसे मोजायला तयार नव्हते. तेव्हा, चेन्नई सुपर किंग्जने डेवाल्ड ब्रेविसला खरेदी केलं. जर मी आता संघात आलो आणि चांगली कामगिरी केली तर माझ्या किंमतीत वाढ होईल', अशी प्रतिक्रिया चैन्नई सुपर किंग्जच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंदन अश्विनने दिली.