भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा सुवर्ण

दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पीमध्ये होणार अंतिम लढत

FIDE Womens World Cup 2025: भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा सुवर्णयोग आला आहे. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकामध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. कारण अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी आणि तरुण दमदार दिव्या देशमुख या दोन खेळाडू अंतिम फेरीत गेल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोघी भारतीय आहेत. दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पीमध्ये अंतिम लढत होणार आहे. कोनेरु हम्पी 38 वर्षाची आहे. तर दिव्या 19 वर्षांची आहे. या दोघींमध्ये आज दुपारी 4:30 ला होणार पहिला सामना होणार आहे. 27 जुलैला दुपारी 4:30 ला होणार दुसरा सामना होणार आहे. तर 28 जुलैला होणार टायब्रेक सामना होणार आहे. 

गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत कोनेरु हम्पी चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये पराभूत केले आहे.सामन्याच्या सुरुवातीला दोन डावांमध्ये दोघांनीही ड्रॉ खेळले. त्यानंतर टायब्रेकच्या 15-15 मिनिटांच्या डावांमध्ये देखील 1-1 अशी बरोबरी झाली. 10-10 मिनिटांच्या पुढील डावांमध्ये लेईने पहिला डाव जिंकून आघाडी घेतली आहे. पण हम्पीने दुसरा डाव जिंंकून सामना पुन्हा बरोबरीत आणला. नंतरच्या टायब्रेक सेटमध्ये हम्पीने पहिल्याच डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला. त्यानंतर फक्त एक ड्रॉ पुरेसा होता, पण हम्पीने तो डावही जिंकून थेट अंतिम फेरी गाठली.  

हेही वाचा: मूळव्याध होण्याची कारणे काय, यावर कोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात?

दिव्या देशमुखची धमाकेदार कामगिरी  दुसरीकडे बुधवारी दिव्या देशमुखने माजी विश्वविजेती चीनच्या झोंगयी टॅन हिला 1.5-0.5 अशा फरकाने हरवून फाईनलमध्ये प्रवेश केला. या ऐतिहासिक अंतिम फेरीमुळे भारताला पहिल्यांदाच FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती मिळणार हे निश्चित झालं आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे की, ही ट्रॉफी अनुभवी हम्पी जिंकेल की तरुण दमदार दिव्या देशमुख इतिहास घडवेल.   महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी देखील पात्रता कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन भारतीय खेळाडूंनी आता पुढील वर्षी होणाऱ्या महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठीही आपली जागा निश्चित केली आहे.