ICC Champions Trophy Prize Money: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम मिळणार? जाणून घ्या
ICC Champions Trophy Prize Money: भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने विक्रमी तिसऱ्यांदा जेतेपदावर कब्जा केला. टीम इंडियाचे हे सलग दुसरे आयसीसी जेतेपद आहे. यापूर्वी, रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2024 मध्ये टी-20 चॅम्पियन बनला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर भारताच्या विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम मिळाली आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला आता किती रक्कम मिळणार ते जाणून घेऊयात...
बऱ्याच प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन भव्य पद्धतीने करण्यात आले. 2017 नंतर पहिल्यांदाच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला 19.45 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर, उपविजेत्या संघाला 9.72 कोटी रुपये देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना 4.86 कोटी रुपये मिळाले. 2017 च्या तुलनेत यावेळी बक्षीस रकमेत 53 टक्के वाढ करण्यात आली.
सर्व संघांना अतिरिक्त पैसे मिळणार -
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रत्येक सामना बक्षीस रकमेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 29.54 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 3.03 कोटी रुपये मिळाले, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1.21 कोटी रुपये मिळाले. मेगा मॅचमध्ये सहभागी झालेल्या सर्व आठ संघांना 1.08 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बक्षीस रक्कम -
विजेता संघ - 19.45 कोटी उपविजेता संघ - 9.72 कोटी उपांत्य फेरीतील पराभूत संघ: 4.86 कोटी रुपये (प्रति संघ) गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणारा संघ 29.54 लाख रुपये (प्रति सामना) पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकाच्या संघाला 3.03 कोटी 7 व्या किंवा 8व्या क्रमांकावर असलेला संघ 1.21 कोटी सर्व सहभागी संघांना 1.08 कोटी रुपये (प्रति संघ) अतिरिक्त रक्कम
दरम्यान आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 251 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा, केएल राहुल, वरुण चक्रवर्ती आणि इतर अनेक स्टार खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर, भारताने ब्लॅक कॅप्स संघाला चार विकेट्सने पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले.