आशिया कपच्या संघाची निवड पूर्ण.

India Asia Cup 2025 Team : एशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; सूर्यकुमार यादव कर्णधार तर...

asia cup 2025

आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबरपासून सुरू होईल.भारतीय संघ या स्पर्धेत आपला पहिला सामना10 सप्टेंबर रोजी खेळेल.मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

शुभमन गिल उपकर्णधार : 

2025 च्या आशिया कपसाठी शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आधी असे म्हटले जात होते की शुभमनला संघात स्थान मिळत नाही, परंतु आता गिलला टीम इंडियामध्ये सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद देण्यासाठी पुढाकार सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा - Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे पूर्ण भरली; 19 ऑगस्टपर्यंत कुठल्या धरणात पाणी किती? 

आशिया कप 2025 साठी भारतीय संघाचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार) संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बूमराह 

हेही वाचा - Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब 

पाच खेळाडू स्टँडबायवर

आशिया कपसाठी पाच खेळाडू स्टँडबायवर असतील. या यादीत प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे. भारत हा आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी ही बहु-राष्ट्रीय स्पर्धा 8 वेळा जिंकली आहे. म्हणजेच, यावेळी भारतीय संघाला 9 व्यांदा आशिया कप जिंकण्याची संधी असेल.