अडिलेडमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटी सामना रोमा

खेळाच्या शेवटी भारत पराभवाच्या वाटेवर

अडिलेड - अडिलेडमध्ये सुरु असलेल्या डे नाईट कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. पहिल्या कसोटीत पराभव  झालेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात चांगले पुनरागमन केले आहे. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज व नंतर फलंदाज ह्यांनी चांगली कामगिरी केली. खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सत्रात 'बॅकफूट' वर टाकले पण गिल, राहुल आणि नितीश कुमार रेड्डी यांचा धावांचाबळावर भारताने १८० धावांचा आकडा गाठला.

  दुसऱ्या दिवशीच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाने २ गडी जलद गमावले. पण ट्रेव्हिस हेड आणि लबुशेनची भागेदारी भारतासाठी घातक ठरली. लबुशेन बाद झाल्यावर भारताने आपले वर्चस्व निर्माण केले पण, ट्रेव्हिस हेडने एकाकी झुंज दिली पहिली त्याने आपले शतक पूर्ण केलं आणि नंतर छोट्या छोट्या इतर फलंदाजांबरोबर भागीदाऱ्या करून आपल्या संघाला बहुमूल्य अश्या १५७ धावांची आघाडी घेऊन देण्यास मदत केली. हेडला १४० धावांवर त्रिफळाचित केलं. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड १४०, मार्नस लबुशेन ६४ तर मॅकस्वेनी ने ३९ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी ४ बळी घेतले. तर आर. अश्विन आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी १ - १ बळी  घेतला. 

    भारताची फलंदाजी सुरु झाली आणि चौथ्याचं षटकात भारताने सलामीवीर के एल राहुलला गमावले. त्यांनतर जैस्वाल आणि शुभमन  गिल ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये एक छोटीशी भागेदारी झाली. पण, त्यानंतर मात्र भारताचा डाव ढासळला. कोहली ११ व रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाले आणि भारताची स्तिथी १०५ धावांवर ५ बाद अशी झाली. दिवसाअंती भारत ५ बाद १२८ अशी  स्तिथी आहे. भारताकडून रिषभ पंत २८ आणि नितीश कुमार रेड्डी १५ धावांवर नाबाद आह. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि बोलँड ह्यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले तर मिचेल स्टार्कने एक गडी बाद केला.        तिसऱ्यादिवशी भारत नक्कीच पंत, रेड्डी आणि अश्विन कडून मोठ्या धावांची अपेक्षा करत असेल तर ऑस्ट्रेलिया संघ भारताला कमी धावत बाद करण्याचा राहील.