रोहित शर्माची शतकीय खेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने शुभ संकेत ?
मुंबई: कट्टकमधील बाराबती स्टेडियमने दिमाखदार फलंदाजी. रोहित शर्माच्या फलंदाजीला 'Poetry in Motion' का म्हणतात हे रोहितने पुन्हा एकदा सिद्ध केले. कॉव्हर्सच्या वरून षटकार असो किंवा फ्लीकचा षटकार म्हणा, रोहितने जणू उत्तम फलंदाजीचं प्रदर्शनचं लावलं होत. रोहितच्या फलंदाजीचं कोणत्याच इंग्लंडच्या गोलंदाजाकडे उत्तर नव्हते.
गेले सहा महिने रोहित शर्माच्या कारकिर्दीतले सर्वात खराब ६ महिने असतील. रोहित शर्मा निवृत्ती घेईल अशी घोषणा अशा बातम्यादेखील पुढे येऊ लागल्या होत्या. या सर्व गोष्टींमधून येऊन हे शतक झळकावणं रोहितच्या आणि भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने सुखाची बाब आहे. रोहितचं 'फॉर्म'मध्ये येणं हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनेदेखील चांगली गोष्ट आहे. इंग्लंड विरुद्धच्या दोन्ही सामन्यात शुभमं गिलने अर्धशतके खेचली आणि श्रेयस अय्यरने देखील चांगल्या खेळी केल्या आहेत. जर विराट कोहली आणि केएल राहुल 'फॉर्म'मध्ये आले तर भारतीय फलंदाजीला रोखणं जगातील सर्व संघांच्या गोलंदाजांची कठीण ठरेल.
रोहित शर्माने त्याच एकदिवसीय क्रिकेटमधलं 32व शतक पूर्ण केलं. शतकांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो आता फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या मागे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर रोहितचं शेवटचं शतक मार्च 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आलं होत. रोहितचा चांगला 'फॉर्म' असाच राहावा अशी प्रत्येक भारतीय चाहत्यांची इच्छा असेल.
रोहित शर्मा म्हणाला की, ''संघासाठी महत्त्वाच्या धावा करून बाहेर पडणे खूप आनंददायक होते. मालिकेतील हा महत्त्वाचा सामना होता, पण मी माझ्या फलंदाजीचा अंदाज घेतला आणि त्यानुसार खेळण्याचा प्रयत्न केला. हा सामना T20 पेक्षा लांब आणि कसोटीपेक्षा छोटा होता, त्यामुळे मला खेळाची शैली समजून घ्यायची होती. माझे लक्ष शक्य तितक्या खोलवर फलंदाजी करण्यावर होते.
खेळपट्टीचा अंदाज घेताना लक्षात आले की काळ्या मातीवर चेंडू किंचित सरकत असतो, त्यामुळे सुरुवातीला बॅटचा संपूर्ण चेहरा दाखवावा लागतो. नंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी शरीराजवळ आणि स्टंपवर चेंडू ठेवायला सुरुवात केली, त्यामुळे मी माझी रणनीती ठरवली आणि योग्य अंतर साधण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात गिल आणि श्रेयस यांची चांगली साथ मिळाली.
गिलसोबत फलंदाजी करताना आनंद मिळतो. तो एक दर्जेदार खेळाडू आहे आणि मोठ्या संख्यांनी किंवा परिस्थितीने तो भारावून जात नाही. मधली षटके अत्यंत महत्त्वाची असतात, कारण त्यातच सामना एका बाजूने झुकू शकतो. जर तुम्ही ती षटके प्रभावीपणे खेळली, तर शेवटच्या षटकांबद्दल फारशी चिंता करण्याची गरज राहत नाही. नागपुरातील सामन्यातही आम्ही मधल्या षटकांचा चांगला उपयोग केला आणि विकेट्स मिळवल्या. विकेट घेत राहिल्यास प्रतिस्पर्धी संघाला धावा करणे अवघड जाते.
आम्हाला सातत्याने चांगले प्रदर्शन करत राहायचे आहे. काही विशिष्ट बाबींवर सुधारणा करायची गरज आहे, पण संघ आणि खेळाडू म्हणून प्रगती करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना स्वतःच्या भूमिकेबद्दल स्पष्टता असायला हवी. जर त्यांनी आपले काम योग्य पद्धतीने सुरू ठेवले, तर त्यावर फारसा विचार करण्याची गरज नाही.''