भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशिया हॉकी कप 2025 स्प

Asia Cup 2025: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशिया हॉकी कप 2025 जिंकून इतिहास रचला; अंतिम फेरीत कोरियाला 4-1 ने मात

Asia Cup 2025: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत जेतेपदावर आपलं नाव कोरलं. अंतिम फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव करत चौथ्यांदा आशिया कप जिंकण्याचा गौरव मिळवला. भारतीय संघ अखंड अजेय राहिला आणि स्पर्धेत कोणताही सामना हरवला नाही.

सुपर 4 फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया यांचा सामना 2-2 अशी बरोबरीत संपला होता. मात्र अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासूनच आघाडी घेतली. सुखजीत सिंगने सुरुवातीच्या 30 सेकंदात पहिला गोल करून संघाच्या विजयाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला. यामुळे दक्षिण कोरिया संघाची धडपड काही उपयोगी ठरली नाही आणि पहिल्या सत्रात त्यांना बरोबरी साधता आली नाही.दुसऱ्या सत्रात भारताने आघाडी आणखी मजबूत केली. दिलप्रीत सिंगने २७व्या मिनिटाला गोल करत संघाची संख्या 2-0 केली. संजयने केलेला लाँग पास दिलप्रीतकडे पोहोचला आणि त्याने गोलकीपरच्या पायांमधून चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. या गोलमुळे भारतीय संघाची आघाडी ठळक झाली. हेही वाचा: US Open 2025: यूएस ओपन स्पर्धेत आर्यना सबालेंका विजयी; अंतिम फेरीत अमेरिकन खेळाडूवर एकतर्फी मात

तिसऱ्या सत्रात संजयला ग्रीन कार्ड मिळाल्याने भारताला काही वेळा कमी खेळाडूंनी खेळावे लागले. मात्र हा फक्त एक मिनिटाचा क्षण होता. सत्राच्या शेवटच्या मिनिटात दिलप्रीतने आणखी एक गोल करत भारताची आघाडी 3-0 ने केली. या गोलाने विजयाच्या आशा अधिक दृढ केल्या. चौथ्या सत्रात अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत भारतासाठी अंतिम आघाडी 4-0 ने केली. या सत्रात दक्षिण कोरियाने पुन्हा प्रयत्न केला आणि एक गोल करत अंतिम स्कोर 4-1 इतका झाला.

भारताने पूर्वी 2003 मध्ये पहिल्यांदा आशिया हॉकी कप जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये दक्षिण कोरियाला, 2017 मध्ये मलेशियाला हरवत विजयी ठरला होता. 2025 मध्ये दक्षिण कोरिया संघाचा पराभव करून भारताने पुन्हा जेतेपदावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं.या विजयाने भारतीय हॉकी प्रेमींमध्ये आनंदाची लहर निर्माण केली आहे. भारतीय संघाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाची मेहनत आणि समर्पण यामुळे हा सुवर्ण क्षण साध्य झाला. विशेष म्हणजे संघाने कोणताही सामना गमावला नाही, जे त्याच्या सशक्त संघभावनेचे प्रतीक आहे.

आशिया हॉकी कप 2025 चा हा विजय भारताच्या हॉकी इतिहासात विशेष स्थान निर्माण करतो. भारतीय संघाने संघभावना, धैर्य आणि कौशल्य यांचे जतन करत आशियातील हॉकीमध्ये आपली पकड आणखी घट्ट केली आहे. या विजयाने देशभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून हॉकी क्षेत्रात भविष्यातील यशासाठी त्यांची धडपड अधिक दृढ होईल.