IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला दुसरी वनडे : मंधानाची दमदार खेळी, भारताची स्थिर सुरुवात
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये आज (17 सप्टेंबर) महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मालिकेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.सामना सुरू झाल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली आहे.
14.1 षटकांनंतर भारताने 1 बाद 80 धावा केल्या आहेत. सलामीवीर स्मृती मंधाना शानदार खेळ करत असून त्या नाबाद 42 धावांवर खेळत आहेत. त्यांच्या साथीला हर्लीन देओल मैदानात असून त्या 4 धावांवर नाबाद आहेत. हेही वाचा: Madan Lal On Mohammad Yusuf: 'सूर्यकुमार यादवचा अपमान हा मूर्खपणा'; मोहम्मद युसुफच्या वक्तव्यावर मदन लाल यांची प्रतिक्रिया
जेमिमा रॉड्रिग्ज आजारी असल्यामुळे मालिकेतून बाहेर झाली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही खेळाडूंची अदलाबदल केली असून डार्सी ब्राउन आणि जॉर्जिया व्हॉल यांना संधी दिली आहे. येत्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही संघांकडून खेळाडूंवर प्रयोग केले जात आहेत.
भारताने पहिल्या सामन्यात चांगली लढत दिली होती, मात्र सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघावर दबाव आहे. मंधानाच्या फलंदाजीमुळे भारताने सध्या स्थिरता राखली आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.