आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात भारताने यूएई स

IND vs UAE T20 Asia Cup : भारतानं नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; UAE चे 50 धावांच्या आत 2 गडी बाद

IND vs UAE T20 Asia Cup Score: आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात भारताने यूएई संघाचा सामना करण्यासाठी नाणेफेक जिंकली असून, कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएईचा कर्णधार मुहम्मद वसीम आहे. भारताच्या संघात हार्दिक पंड्या, शुभमन गिल, टिळक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहने जोरदार गोलंदाजी करत अलिशान शराफूला क्लीन बोल्ड केले. शराफू सामन्यात फक्त 17 चेंडूत 22  धावा काढण्यात यशस्वी झाला. बुमराहने या षटकात फक्त 6 धावा दिल्या. पहिल्या षटकानंतर युएई संघाचा स्कोअर 10 धावांचा आहे, ज्यात अलिशान शराफू आणि मुहम्मद वसीम क्रीजवर आहेत. हार्दिक पांड्या यांनी पहिल्या षटकात दोन चौकार मारले. युएईचे 50 धावांच्या आत 2 गडी बाद झाले. 

कुलदीप यादवचा दबदबा कायम - 

कुलदीप यादव युएई विरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करत आहे. त्याने पहिल्या चेंडूवर राहुल चोप्रा, चौथ्या चेंडूवर मुहम्मद वसीम आणि शेवटच्या चेंडूवर हर्षित कौशिष यांना बाद केले आहे. 10 षटकांनंतर युएई संघाने 5 विकेट गमावून 51 धावा केल्या आहेत. ध्रुव पराशर आणि आसिफ क्रीजवर उपस्थित आहेत. भारतीय गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजीचे उदाहरण सादर करत आहेत. 

 

हेही वाचा - Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अद्याप का विकली गेली नाहीत? अहवालात समोर आले खरे कारण

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन 

भारतीय संघात अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - Hardik Pandya Watch : हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का; Asia Cupच्या बक्षीसाच्या रकमेहूनही आहे महाग

यूएई संघाची प्लेइंग इलेव्हन:

तथापी, यूएई संघात मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा, आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग यांचा समावेश आहे.