IPL 2025 tickets LIVE : हवी ती जागा पटकन बुक करा!
क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! मुंबई इंडियन्सच्या निष्ठावान पलटनसाठी मोठी बातमी – IPL 2025 साठी वानखेडे स्टेडियमची तिकिटे आता LIVE झाली आहेत!
आजपासून, MI Family Membership प्लॅनमधील गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्यांसाठी तिकिटे उपलब्ध आहेत. पाच वेळचे IPL विजेते असलेल्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या सामन्यांसाठी तुम्ही आता तुमची जागा निश्चित करू शकता!
MI Family Membership तिकिट विक्री तीन टप्प्यांत सुरू होईल: पहिला टप्पा (LIVE!): गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्यांना प्राधान्य. दुसरा आणि तिसरा टप्पा: पुढील दोन दिवसांत इतर MI Family सदस्यांसाठी तिकिट खरेदीची संधी मिळणार. अधिक माहितीसाठी लक्ष ठेवा!
तिकिटे बुक करण्याची सोपी पद्धत
तिकिटे बुक करण्यासाठी BookMyShow.com ला भेट द्या
तुमच्या मुंबई इंडियन्स अकाऊंट किंवा MI अॅपशी लिंक असलेल्या ई-मेल/मोबाईल नंबरने लॉगिन करा
हवी ती जागा पटकन बुक करा! ही तर सुरुवात आहे – आणखी तिकिट विक्रीचे टप्पे आणि रोमांचक अपडेट्स लवकरच येणार आहेत. मग उशीर कशाला? वानखेडेवर MI ची जादू अनुभवण्यासाठी आताच तिकिटे बुक करा!