टीम नाही, वादळ आहे! IPL 2025 मध्ये अशी आहे SRH ची भेदक प्लेइंग 11
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या स्पर्धेला सुरूवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सद्या सर्व संघ आपल्या अंतिम तयारीत मग्न आहेत. गतवर्षीच्या उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने या वर्षी अजून मजबूत संघ बांधणी केली आहे. हैदराबादचा संघ 23 मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यंदाच्या वर्षी हैदराबादकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
सनरायझर्सच्या फलंदाजीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे आक्रमक टॉप ऑर्डर. संघाची ओपनिंग जोडी ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांची असेल. हे दोघे पॉवर प्लेमध्ये मोठे फटकेबाजी करून संघाला चांगली सुरुवात देऊ शकतात. तिसऱ्या क्रमांकावर यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन खेळेल. टी-20 मध्ये वेगाने धावा करण्याची क्षमता असलेल्या ईशानकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
हेही वाचा - IPL इतिहासातील बेस्ट ११ खेळाडू, गिलख्रिस्टच्या संघात कोणाला स्थान ?
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन हे तडाखेबाज फलंदाज असतील. विशेषतः क्लासेनचा फॉर्म पाहता तो संघासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. सहाव्या क्रमांकावर अभिनव मनोहर हा युवा भारतीय खेळाडू संघाची फलंदाजी अधिक भक्कम करू शकतो. सातव्या स्थानावर अष्टपैलू वियान मुल्डर असणार आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
सनरायझर्सकडे यंदा एक भेदक वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. संघाचे नेतृत्व करणारा पॅट कमिन्स, अनुभवी मोहम्मद शमी आणि डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेल यांच्यावर संघाच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. स्पिन विभागात संघाकडे अनुभवी फिरकीपटू राहुल चाहर आहे. तो मधल्या षटकांत विकेट घेण्याची क्षमता ठेवतो. त्याच्यासोबत एडम झम्पा देखील पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
हेही वाचा - MI Won WPL २०२५ : मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन, दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
हैदराबादची संभाव्य प्लेइंग 11
ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर, वियान मुल्डर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, राहुल चाहर
इम्पॅक्ट प्लेयर : जयदेव उनाडकट