LSG vs MI Today Playing 11 Prediction : लखनऊच्या इ

LSG vs MI Today Playing 11: लखनऊ-मुंबई भिडणार, अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन

LSG vs MI Today Playing 11: लखनऊ-मुंबई भिडणार, अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन

LSG vs MI Today Playing 11 Prediction : IPL 2025 मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना रंगणार आहे. उभय संघातील हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना केवळ गुणतालिकेतील स्थितीपेक्षा जास्त काही ठरवणारा आहे. दोन्ही संघातील काही दिग्गज खेळाडू सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. त्यांना या सामन्याच्या माध्यमातून पुन्हा लय प्राप्त करण्याची संधी आहे.    घरच्या मैदानावर खेळत असल्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतला अजूनही सूर गवसलेला नाही. त्याला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. त्याच्या फॉर्मवर संघाची मधली फळी निर्भर आहे. याशिवाय लखनऊची गोलंदाजी फॉर्मात नाही. पण वेगवान गोलंदाज आकाशदीप आता फिट असून तो संघात सामील होण्याची शक्यता आहे. त्याने याआधी RCB साठी खेळताना चांगली कामगिरी केली आहे. आता लखनऊने त्याला 8 कोटींना विकत घेतले आहे.

हेही वाचा - Indian Cricketer Wife: 'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी

मुंबई इंडियन्सकडे पाहिलं तर त्यांचा सलामीवीर रोहित शर्मा देखील खराब फॉर्मशी झगडत आहे. IPL 2025 च्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने केवळ 21 धावा केल्या आहेत. पण लखनऊच्या मैदानावर त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. त्यामुळे आज तो मोठी खेळी करेल, अशी आशा आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रेयान रिकेल्टन हे फलंदाज मुंबईला चांगली धावसंख्या उभारून देऊ शकतात. गोलंदाजीत मुंबईकडं ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर आणि नवोदित अश्विनी कुमारसारखे पर्याय आहेत. त्यांनी अलीकडच्या सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे आणि आजही त्यांच्याकडून तसाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

हेही वाचा -  ‘हे’ आहेत IPL मध्ये सर्वाधिक मॅच जिंकणारे कर्णधार

लखनऊ सुपर जायंट्स संभाव्य प्लेईंग 11:  ऋषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, एडेन मार्करम, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेविड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवि बिश्नोई.

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग 11:  रोहित शर्मा, रेयान रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, विग्नेश पुथुर.

उभय संघातील हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि स्टार स्पोर्ट्सवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.