सोनीने आशिया कप 2025 चे टेलिकास्टिंग राईट्स घेतले

IND vs PAK vs Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना थेट पाहण्यासाठी एकापेक्षा अधिक पर्याय; कुठे पहाल सामना? जाणून घ्या

IND vs PAK vs Live Streaming: आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघानेही आपला पहिला सामना खेळला आहे. मात्र, चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाबद्दल सुरू आहे. गेल्या काही काळापासून क्रिकेटप्रेमींना सामने जिओ हॉटस्टारवर पाहण्याची सवय झाली होती. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे सामने याच प्लॅटफॉर्मवर दाखवले गेले होते. पण या वेळेस परिस्थिती बदलली आहे. आता सामने ना स्टार स्पोर्ट्सवर येत आहेत, ना जिओ हॉटस्टारवर. आशिया कप 2025 चे प्रसारण हक्क सोनी वाहिनीकडे आहेत.

टीव्हीवर कुठे पाहू शकता सामने?

सोनीने आशिया कप 2025 चे टेलिकास्टिंग राईट्स घेतले आहेत. त्यामुळे सामने Sony Sports Networkच्या विविध चॅनेलवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांना आपापल्या सोयीप्रमाणे आवडत्या भाषेत समालोचन ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मोबाईलवर कुठे पाहू शकता सामने?

मोबाईलवर सामने पाहण्यासाठी SonyLIV अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये आधीपासून असल्यास त्याला अपडेट करावे लागेल. नसल्यास अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. सोनी व्यतिरिक्त सामने FanCode अ‍ॅपवर देखील पाहता येतील.

हेही वाचा Supreme Court on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामना होणारच! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरे गटाची गोची?

दरम्यान, जर एखादा विशिष्ट सामना पहायचा असेल तर फक्त 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. संपूर्ण आशिया कप पाहायचा असल्यास 189 रुपयांचा पॅक खरेदी करावा लागेल.

हेह वाचा - IND vs UAE T20 Asia Cup : भारतानं नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; UAE चे 50 धावांच्या आत 2 गडी बाद

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

भारतीय संघाचा पुढील सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामाना रात्री 8 वाजता सुरू होईल.