नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंत

World Athletics Championships: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून नीरज चोप्रा बाहेर; सचिन यादवचे पदक थोडक्यात हुकले

World Athletics Championships: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राची आशा पूर्ण झाली नाही. नीरजचा अंतिम फेरीतील सर्वोत्तम थ्रो 84.03 मीटरचा होता. नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा दुसरा स्टार भालाफेकपटू सचिन यादव चौथ्या स्थानावर राहिला. त्याने 86.27 मीटरची भालाफेक केली, जी पदकापासून फक्त 40 सेंटीमीटरने कमी होती. तथापी, पाकिस्तानचा अर्शद नदीम आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याचा सर्वोत्तम थ्रो 82.75 मीटर होता.

दरम्यान, सुवर्णपदक त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटच्या हाती गेले. त्याने 88.16 मीटरची भालाफेक केली. तर रौप्य पदक ग्रेनाडाच्या पीटर्सने जिंकले (87.38 मीटर), तर अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्राने 2023 मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. परंतु, सलग दुसऱ्यांदा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवण्याच्या त्याच्या आशा संपल्या आहेत.

हेही वाचा China Masters 2025: थायलंडच्या खेळाडूवर विजय मिळवून पीव्ही सिंधूचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवे

अंतिम फेरीत नीरज चोप्राची कामगिरी 

1ला थ्रो: 83.65 मीटर 2रा थ्रो: 84.03 मीटर 3रा थ्रो: फाउल 4था थ्रो: 82.86 मीटर 5वा थ्रो: फाउल

सचिन यादवच्या थ्रोची माहिती 

1ला थ्रो: 86.27 मीटर 2रा थ्रो: फाउल 3रा थ्रो: 85.71 मीटर 4था थ्रो: 84.90 मीटर 5वा थ्रो: 85.96 मीटर 6था थ्रो: 80.95 मीटर

हेही वाचा - Jasprit Bumrah: ओमानविरुद्ध सामन्यात बुमराह खेळणार नाही? भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय

दरम्यान, पात्रता फेरीत नीरजने 84.85 मीटरची भालाफेक केली होती, तर सचिनने 83.67 मीटरची भालाफेक करत अंतिम फेरीसाठी आपले स्थान सुनिश्चित केले. या स्पर्धेत भारताच्या दोन्ही भालाफेकपटूंची कामगिरी कौतुकास्पद असली तरी, अंतिम फेरीत पदक मिळवण्याची संधी दोघांनाही हातून गेलेली आहे.