Pakistan Boycott Asia Cup: पाकिस्तानचा UAE विरुद्ध आशिया कप सामन्यावर बहिष्कार; हस्तांदोलन वादानंतर घेतला मोठा निर्णय
Pakistan Boycott Asia Cup: आशिया कप 2025 दरम्यान एक मोठा राजकीय आणि क्रीडा वाद उभा राहिला आहे. पाकिस्तानने स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला असून, त्यांचा अखेरचा गटस्तरीय सामना यूएईविरुद्ध होणार होता. मात्र, सामन्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघाला हॉटेलमध्येच थांबवले आहे. तथापि, पाकिस्तानने या सामन्यापूर्वी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे यूएईचा सुपर फोरमध्ये पात्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वादाचे कारण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीनंतर झालेल्या हस्तांदोलनाच्या वादामुळे पाकिस्तानने हा कठोर निर्णय घेतला. पाकिस्तानचा आरोप आहे की आयसीसीचे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी या वादात भारताची बाजू घेतली. त्यांनी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणीही केली होती, मात्र आयसीसीने ती फेटाळली आणि पायक्रॉफ्ट यांना रेफरी म्हणून कायम ठेवले.
भारत-पाक सामना संपल्यानंतर काय घडलं ?
भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता. मात्र सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्याऐवजी थेट ड्रेसिंग रूमकडे गेले. पाकिस्तानी खेळाडू मैदानावर वाट पाहत असतानाही भारतीय संघाने ड्रेसिंग रूमचे दार बंद केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली.
हेही वाचा - ICC ODI Ranking: आयसीसी T20 क्रमवारीत वरुण चक्रवर्ती अव्वल; तर महिला क्रमवारीत स्मृती मानधनाचा विजयी
PCB ची प्रतिक्रिया
दरम्यान, PCB प्रमुख मोहसिन नक्वी लवकरच आपत्कालीन पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानचा बहिष्कार अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर आशिया कपच्या स्पर्धात्मकतेवर मोठा परिणाम होणार आहे. या घडामोडीमुळे आशिया कप 2025 मध्ये भारत- पाकिस्तान क्रिकेट संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.