सिंधू पहिल्या सेटमध्ये 14-21 ने, तर दुसऱ्या सेटमध्

China Masters 2025: पीव्ही सिंधू चायना मास्टर्स 2025 क्वार्टर फायनलमधून बाहेर; अन से यंगकडून सरळ सेटमध्ये पराभव

China Masters 2025: भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा चायना मास्टर्स 2025  स्पर्धेतील महिला एकेरी क्वार्टरफायनलमध्ये पराभव झाला. सिंधूचा सामना सध्याची जागतिक नंबर 1 शटलर दक्षिण कोरियाची अन से यंगशी झाला, ज्यात तिला फक्त 38 मिनिटांत सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. सिंधू पहिल्या सेटमध्ये 14-21 ने, तर दुसऱ्या सेटमध्ये 13-21 ने पराभूत झाली. जागतिक नंबर एक असलेल्या अन से यंगविरुद्ध सिंधू पूर्णपणे दबावाखाली दिसली. सिंधूने आतापर्यंत अन से यंगविरुद्ध एकूण 8 सामने खेळले आहेत. परंतु, या सर्व सामन्यात तिला पराभव स्विकारावा लागला.

हेही वाचा - Usain Bolt Struggles to Breathe : कधीकाळी जगातला सर्वात वेगवान धावपटू असलेल्या उसेन बोल्टला आता का झालंय पायऱ्या चढणंही अवघड?

स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 आणि प्री-क्वार्टरफायनलमध्ये सिंधूने दमदार कामगिरी करून क्वार्टरफायनलसाठी आपले स्थान निश्चित केले होते. हाँगकाँग ओपनमध्ये पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर चाहत्यांना चायना मास्टर्समध्ये सुधारित कामगिरीची अपेक्षा होती, पण अन से यंगविरुद्ध सिंधूला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.

सिंधूच्या पराभवानंतर आता भारताचे लक्ष सात्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर लागले आहे. या दोघांनी पुरुष दुहेरीत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांनी हाँगकाँग ओपन आणि चायना मास्टर्समध्ये दमदार खेळ दाखवला आहे.

हेही वाचा - World Athletics Championships: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून नीरज चोप्रा बाहेर; सचिन यादवचे पदक थोडक्यात हुकले

सात्विक-चिराग आता चीनच्या रेन झिंग यू आणि झाई हाओनान या जोडीशी सामना करतील. जर ते विजयी झाले, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना लिओ रॉली कार्नांडो आणि बागास मौलाना किंवा आरोन चिया आणि सोह वूई यिक या जोडीशी होईल. हाँगकाँग ओपन 2025 मध्ये या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण तेथील चिनी जोडीविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता.