राजीव शुक्ला असणार BCCI चे कार्यवाहक अध्यक्ष; रॉजर बिन्नीची घेणार जागा
नवी दिल्ली: बीसीसीआय संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असणार आहे. राजीव शुक्ला पुढील महिन्यात रॉजर बिन्नी यांची जागा घेतील. 70 वर्षीय बिन्नी 19 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. शुक्ला सध्या क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि पुढील 3 महिन्यांसाठी ते कार्यवाहक अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
रॉजर बिन्नी या वर्षी 19 जुलै रोजी 70 वर्षांचे होतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार, वयाच्या 70 व्या वर्षानंतर कोणतीही व्यक्ती अध्यक्ष पदावर राहू शकत नाही. या कारणास्तव त्यांना त्यांचे पद सोडावे लागेल. अशा परिस्थितीत, अध्यक्ष पदासाठी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीची निवड होईपर्यंत राजीव शुक्ला बीसीसीआय अध्यक्षाची भूमिका बजावतील.
हेही वाचा - ठरलं तर मग! क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज अडकणार लग्नबंधनात
दरम्यान, 2022 मध्ये रॉजर बिन्नी यांची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौरव गांगुलीची जागा घेतली. बिन्नी हे भारतातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणले जातात. बिन्नीने भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामने खेळले. दोन्ही फॉरमॅट एकत्र करून त्यांनी एकूण 126 विकेट्स घेतल्या. 1983 च्या विश्वचषकात भारताच्या विजयात रॉजर बिन्नीचा मोठा वाटा होता.
हेही वाचा - IPL 2025: एलिमिनेटरमध्ये गुजरातच्या पराभवाचा सर्वात मोठा 'खलनायक' ठरला कुसल मेंडिस
तथापि, राजीव शुक्ला 2020 पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय त्यांनी 2017 पर्यंत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (यूपीसीए) चे सचिव म्हणूनही काम केले आहे. शुक्ला 2018 पर्यंत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष देखील होते. आता ते बीसीसीआय अध्यक्षपदाची भूमिका सांभाळताना दिसणार आहेत.