Rohit Sharma Spotted Driving Lamborghini Urus: रोहित शर्माने मुंबईच्या रस्त्यावर चालवली 4 कोटींची लॅम्बोर्गिनी उरुस कार, पहा व्हिडिओ
Rohit Sharma Spotted Driving Lamborghini Urus: भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतीच एक आलिशान लॅम्बोर्गिनी उरुस SE खरेदी केली आहे. रोहितची ही कार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आता सोशल मीडियावर हिटमॅनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो मुंबईच्या रस्त्यांवर ही लक्झरी कार चालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रोहितने पांढरा टी-शर्ट आणि पांढरी टोपी घातलेली असून, तो गर्दीच्या रस्त्यांवरून आपल्या नवीन ऑरेंज लॅम्बोर्गिनीला सहजतेने चालवत आहे. ही कार त्याच्या जुन्या निळ्या लॅम्बोर्गिनीची जागा घेत आहे, जी त्याने ड्रीम 11 स्पर्धेच्या विजेत्याला भेट म्हणून दिली होती.
हेही वाचा - Cristiano Ronaldo Engaged: 8 वर्षांच्या नात्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो-जॉर्जिना रॉड्रिग्ज यांचा साखरपुडा
खास नंबर प्लेटमागचं कारण -
रोहितच्या या लॅम्बोर्गिनीला 3015 अशी खास नंबर प्लेट आहे. हा नंबर त्याच्या दोन्ही मुलांच्या जन्मतारखांवरून घेतला गेला आहे. मुलगी समायरा 30 डिसेंबर रोजी आणि मुलगा अहान 15 नोव्हेंबर रोजी जन्मला आहे. या कारची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.
रोहितने याआधी टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतो. मात्र, रिपोर्ट्सनुसार संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याला विजय हजारे ट्रॉफी किंवा इंडिया ‘A’ सारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावे लागू शकते.