Special Olympic Bharat : राज्यपालांच्या हस्ते बक्षीस वितरण, बौध्दिक दिव्यांग ऑलिम्पिकचा समारोप
मुंबई: मुंबईत बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आज 6 ऑगस्ट रोजी स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आले. बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या स्पर्धेचे 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलं.
बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच या मागचा उद्देश्य होता. ही संस्था स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनलची मान्यताप्राप्त शाखा आहे आणि 2001 मध्ये तिची स्थापना झाली. 4, 5 ऑगस्टला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. कांदिवलीमध्ये स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. 3 ते 6 ऑगस्टदरम्यान खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेत 139 स्पर्धक, त्यांच्यासोबत त्यांचे 50 कोचेस आणि एस्कॉर्टस अशा एकूण 150 जणांचा समूह या ठिकाणी आला होता. कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरणतलावात बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केला असून बौद्धिक दिव्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या स्पर्धेचे प्रायोजकत्व जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने स्वीकारले.
पारितोषिक वितरण यादी
सिनियर (महिला) - 100 मीटर फ्री स्टाईल अनवी विजयभाई झंझरुकिया - सुवर्ण पदक - गुजरात मनिरा मूर्तजा - रौप्य पदक - महाराष्ट्र सुप्रिया यलाप्पा - कांस्य पदक - कर्नाटक
जुनियर (पुरुष) - 200 मीटर फ्री स्टाईल निथरुर राजागोपाल - सुवर्ण पदक - तमिळनाडू मितंग हेमांग शाह - रौप्य पदक - गुजरात शिव देव सिंग - कांस्य पदक - राजस्थान
सब जुनियर (पुरुष) - 50 मीटर फ्री स्टाईल इझरान वाली - सुवर्ण पदक - मध्यप्रदेश रुद्र गुप्ता - रौप्य पदक - दिल्ली अर्ष मिश्रा - कांस्य पदक - उत्तरप्रदेश