किक्रेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. आयसीआयसीआयने महिलां

Women's World Cup 2025: खुशखबर! ICC क्रिकेट वर्ल्डकपचे काही सामने होणार महाराष्ट्रात; जाणून घ्या सुधारित वेळापत्रक

मुंबई: किक्रेटप्रेमींसाठी खुशखबर आहे. आयसीआयसीआयने महिलांचा एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या वेळापत्रकात एक मोठा बदल केला आहे. महिलांचा एकदिवसीय विश्वचषकचे सामने आता महाराष्ट्रात होणार आहेत. हा सामना 30 सप्टेंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या काळात होणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती आयसीसीने ट्विट करून दिली. त्यामुळे, किक्रेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी होणार महिलांचा एकदिवसीय विश्वचषक सामना

काही वर्षांपूर्वी महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक 2025 चे काही सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाले होते. तेव्हा, किक्रेटप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे, आयसीसीसीने यंदाचे पाचही सामने आता नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

कधी आणि कुठे होणार 'हे' सामने

20 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीलंका विरुद्ध बंगलादेशचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर, 23 ऑक्टोबर 2025 रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. 26 ऑक्टोबर 2025 रोजी भारत विरुद्ध बांग्लादेशचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. 30 ऑक्टोबर 2025 रोजी होणारा दुसऱ्या सेमी फायनलचा सामनाही नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.