Flipkart Freedom Sale 2025: फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 13 ऑगस्टपासून सुरू; अॅपल-सॅमसंगचे फोन अर्ध्या किमतीत मिळणार
Flipkart Freedom Sale 2025: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर पुन्हा एकदा मोठ्या ऑफर्सचा पाऊस पडणार आहे. गेल्या आठवड्यात 8 ऑगस्टला संपलेल्या फ्रीडम सेलनंतर, कंपनीने आणखी एक नवीन सेल जाहीर केला आहे. हा सेल 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या सेलमध्ये, ग्राहकांना एकूण 78 फ्रीडम डील्स मिळतील. सुपर कॉइनद्वारे खरेदीवर 10% अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. यामुळे खरेदीचा फायदा अधिक वाढणार आहे.
मोठ्या ब्रँड्सवर मोठी सूट
या पाच दिवसांच्या सेलमध्ये सॅमसंग, मोटोरोला, व्हिवो, आसुस, एचपी, टीसीएल यांसारख्या नामांकित ब्रँड्सची उत्पादने मोठ्या सवलतीसह उपलब्ध असतील. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, सर्व उत्पादनांवर 10% बँक डिस्काउंट, कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत.
अॅपल आणि सॅमसंग फ्लॅगशिप फोन अर्ध्या किमतीत मिळणार -
स्मार्टफोन प्रेमींसाठी या सेलमध्ये मोठी संधी आहे. अॅपलचे जुने आयफोन मॉडेल्स जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करता येणार आहेत. आयफोन 13 आणि आयफोन 14 सिरीजवर 40 टक्के पर्यंत सूट मिळू शकते, तर आयफोन 15 आणि आयफोन 16 वर देखील आकर्षक ऑफर्स असतील.
हेही वाचा - AI Health Risk: ChatGPTचा सल्ला पडला महागात; तीन महिने खाल्ला धोकादायक पदार्थ आणि झाला दुर्मिळ आजार
खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी-
तथापी, सॅमसंगच्या बाबतीत, गॅलेक्सी एस23 आणि गॅलेक्सी एस24 सिरीजचे फ्लॅगशिप फोन अर्ध्या किमतीत उपलब्ध असतील. याशिवाय, या वर्षी लाँच झालेल्या गॅलेक्सी एस25 सिरीजच्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. या सेलमुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन आणि गॅझेट्स खरेदीसाठी उत्तम संधी देणार आहे.