जगभरातील करोडो लोक गुगलचा वापर करतात. मात्र आता गु

Google : गुगल ही सेवा करणार कायमची बंद, करोडो युजर्सना बसणार फटका

मुंबई: जगभरातील करोडो लोक गुगलचा वापर करतात. मात्र आता गुगल एक खास सेवा बंद करणार आहे. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे. या वर्षाच्या शेवटी गुगल ही सेवा बंद करणार आहे. त्यामुळे गेमिंग युजर्सना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गुगल आता क्रोमबुक बीटासाठी स्टीमला सपोर्ट करणे बंद करणार आहे. ही सेवा बंद केल्यामुळे, वापरकर्ते स्टीमद्वारे क्रोमबुकवर गेम खेळू शकणार नाहीत. ही सेवा बंद का बंद केली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेले नाही. 

1 जानेवारी 2026 पासून ही खास सेवा बंद होणार 9टू5 गुगलच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, गुगलने यासाठी क्रोमबुक वापरकर्त्यांना एक मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये वापरकर्त्यांना सांगण्यात आले आहे की, ते पुढील काळात स्टीमद्वारे गेम खेळू शकणार नाहीत. 1 जानेवारी 2026 पासून पासून गुगल स्टीम लाँच करु शकणार नाही. मात्र बीटा अॅप 31 डिसेंबर 2025 पर्यंत काम करणार आहे. त्यानंतर ते ही बंद होणार आहे. 

हेही वाचा: UMANG App Ration Card: घरी बसून मिळवा नवं रेशन कार्ड; मोबाईलवरून अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

स्टीम काय आहे?  स्टीम हा एक पीसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे, याद्वारे तुम्ही पीसीवर गेम डाऊनलोड करु शकता. तसेच याद्वारे काही गेम भाड्याने देखील घेता येतात. यासाठी तुम्हाला तुमच्या पीसीवर स्टीम अॅप डाऊनलोड करावे लागते. 2022 मध्ये, गुगलने स्टीमच्या सहकार्याने क्रोमबुक वापरकर्त्यांसाठी याचे बीटा व्हर्जन आणले होते, मात्र आता ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच काम करणार आहे, यानंतर ते बंद होईल. 

गुगल क्रोमबुकमध्ये स्टीमद्वारे 99 वेगवेगळे टायटल गेम खेळता येतात. हे या ऑपरेटिंग सिस्टमशी सुसंगत आहे. मात्र आता वापरकर्ते 1 जानेवारीपासून अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर हे गेम खेळू शकणार आहेत. आता वापरकर्ते स्टीमऐवजी प्ले स्टोअरवरुन गेम डाऊनलोड करावा लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर काही गेम डाऊनलोड करण्यासाठी पैसेही मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गेम खेळणाऱ्या वापरकर्त्यांनाआर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.