आपल्या घराला स्मार्ट बनवण्यासाठी बाजारपेठेत अनेक न

Smart Home Gadgets: स्मार्ट होम गॅजेट्सच्या वापराने तुमचे जीवन होईल अधिक सुलभ

सध्या डिजिटलचा जमाना आहे. घरातल्या स्मार्टफोनपासून ते अगदी टीव्हीपर्यंत अनेक गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. हे स्मार्ट गॅजेट्स इंटरनेट आणि ब्लूटूथ यांच्या मदतीने कनेक्ट होते. या स्मार्ट होम गॅजेट्समुळे अनेकांचे जीवन अजून सोप्पे झाले आहेत. आजकाल घरातील एसी चालू करण्यापासून ते घरातील लाईट्स मूडनुसार बदलण्यापर्यंत अनेक साऱ्या गोष्टी एका क्लिकने बदलता येते. सध्या मार्केटमध्ये स्मार्ट होम गॅजेट्सची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या घराला स्मार्ट बनवण्यासाठी बाजारपेठेत अनेक नवनवीन गॅजेट्स आले आहेत. चला तर जाणून घेऊया कोण-कोणते आहेत ते स्मार्ट होम गॅजेट्स. 

1 - स्मार्ट होम डोअरबेल:

सध्या बाजारात स्मार्ट होम गॅजेट्सची डिमांड मोठ्या प्रमाणात आहे. अशातच बाजारात स्मार्ट होम डोअरबेल आले आहे. ज्यामुळे तुमच्या घरात कोण आले आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला दरवाजा न उघडता आपल्या दारात कोण आले आहे अगदी सहजपणे पाहू शकता. स्मार्ट होम डोअरबेलला कॅमेरा आणि मायक्रोफोन असल्यामुळे तुम्हाला समोरच्या दरवाज्यातून तुमच्या फोनमध्ये  असलेल्या डोअरबेल ॲपमध्ये व्हिडिओ पाठवते. त्यामुळे तुम्ही कुठे जरी असाल तरीसुद्धा तुम्ही सहजपणे बघू शकता. 

2 - स्मार्ट स्पीकर:

सध्या अनेकजण स्मार्ट स्पीकर मोठ्या प्रमाणात आपल्या घरी आणत आहेत. नुकताच अमेझॉनने 2014 मध्ये पहिल्यांदा अलेक्सा नावाच्या स्मार्ट स्पीकरला लाँच केले. अलेक्सा आपल्या मूडनुसार विविध गाणी लावते, किंवा एखादे प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर देते. त्यामुळे अनेकांमध्ये या स्मार्ट स्पीकर विषयी उत्सुकता असल्याचे पहायला मिळते. स्मार्ट स्पीकरच्या वाढत्या डिमांडमुळे अनेक सेलिब्रिटीदेखील याचा वापर करतात. 

हेही वाचा: मेटा AI साठी वेगळे अॅप लाँच करणार; ChatGpt आणि Gemini ला देणार टक्कर  

3 - स्मार्ट कंट्रोल प्लग:

बऱ्याचदा आपण घरातून बाहेर पडताना अनेकदा लाईट, फॅन बंद करायला विसरतो. त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट कंट्रोल प्लग तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. स्मार्ट कंट्रोल प्लगच्या मदतीने तुम्ही स्मार्ट कंट्रोल प्लगवर टायमर सेट करू शकता. जर कधी गडबडीमध्ये तुम्ही लाईट, फॅन बंद करायला विसरला तर तुम्ही बसल्या ठिकाणी एका क्लिकने बंद करू शकता. 

4 - एक स्मार्ट स्लीप मॉनिटर:

स्मार्ट स्लीप मॉनिटर तुम्हाला रात्री वेळेत झोपण्यासाठी मदत करते. रात्री घेतलेली चांगली झोप आपला संपूर्ण दिवस फ्रेश बनवते. स्मार्ट स्लीप मॉनिटर तुमच्या  झोपेच्या सवयींचे सॅम्पल्स गोळा करते. हे स्मार्ट स्लीप मॉनिटर तुम्ही तुमच्या अंगठ्यालादेखील लावून झोपू शकता. हे स्मार्ट स्लीप मॉनिटर तुमच्या हृदयाच्या हालचालींचे विश्लेषण करते. त्यासोबत स्मार्ट स्लीप मॉनिटर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीचे देखील विश्लेषण करते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबदल सहज माहिती मिळते.