सायबर गुन्हेगारी सारख्या क्रियांमुळे प्लॅटफॉर्मचा

Meta ने भारतात एका महिन्यात बंद केले 80 लाख WhatsApp अकाउंट; काय आहे कारण? जाणून घ्या

WhatsApp Bans Over 8 Million Indian Accounts

WhatsApp Bans Over 8 Million Indian Accounts: जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने मोठी कारवाई केली आहे. कवेळ एका महिन्यात 84 लाखांहून अधिक अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारी सारख्या क्रियांमुळे  प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याच्या मेटाने हे पाऊल उचलले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, घोटाळे आणि संशयास्पद क्रियाकलापांच्या अहवालांनंतर या खात्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा - New Sim Card Rules: आता नवीन सिम कार्ड खरेदी करताना पाळावे लागतील 'हे' नियम!

मेटाने प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेसाठी ही पावले उचलली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 4(1)(डी) आणि कलम 3अ(7) च्या तरतुदींनुसार मेटाने भारतात सुमारे 8.45 दशलक्ष व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घातली आहे, असे अहवालात उघड झाले आहे. वारंवार तक्रारी आणि सुरक्षा वाढवण्याच्या प्रयत्नांनंतर ही कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा - Apple च्या परवडणाऱ्या iPhone 16e चे Manufacturing भारतात सुरू; काय असेल किंमत? जाणून घ्या

दरम्यान, मेटाच्या अहवालात असे दिसून आले आहे की 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ही बंदी घालण्यात आली होती. एकूण बंदी घातलेल्या खात्यांपैकी 1.66 दशलक्ष खात्यांना गंभीर उल्लंघनांमुळे ब्लॉक करण्यात आले होते, तर उर्वरित खात्यांना चौकशीदरम्यान संशयास्पद आढळल्यानंतर बंदी घालण्यात आली होती. विशिष्ट देखरेखीदरम्यान, वापरकर्त्यांकडून कोणतीही तक्रार न करता 1.6 दशलक्षाहून अधिक खाती बॅन करण्यात आली कारण त्यांचा गैरवापर होत होता.

व्हॉट्सअॅप अकाउंट्स बॅन करण्यामागेची कारणे - 

सेवा अटींचे उल्लंघन: यामध्ये मोठ्या प्रमाणात संदेश पाठविणे, स्पॅमिंग करणे, फसव्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे आणि दिशाभूल करणारी किंवा हानिकारक माहिती सामायिक केल्यामुळे अनेक व्हॉट्सअॅप अकाउंट्स बंद करण्यात आले. 

अनुचित क्रियाकलाप: कायदेशीर पालनासाठी WhatsApp च्या वचनबद्धतेचा भाग म्हणून बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये सहभागी असलेल्या खात्यांवर देखील बंदी घालण्यात आली.

वापरकर्त्यांच्या तक्रारी: प्लॅटफॉर्मवर छळ, गैरवापर किंवा अनुचित वर्तनाबाबत वापरकर्त्यांकडून येणाऱ्या तक्रारींवर WhatsApp देखील कारवाई करते.