एआय-संचालित 'डेथ क्लॉक' तुमची जन्मतारीख, फिटनेस दि

आता AI Death Clock सांगणार तुमचा मृत्यू कधी होणार; काय आहे 'एआय डेथ क्लॉक'? जाणून घ्या

AI Death Clock

AI Death Clock: एखादी व्यक्ती कधी मरू शकते? याबद्दल कोणीही काहीही सांगू शकत नाही. पण तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, 'माझा मृत्यू कधी होऊ शकतो.' परंतु, आता एआय डेथ क्लॉक तुम्हाला तुमचा मृत्यू कधी होणार हे सांगणार आहे. एआय-संचालित 'डेथ क्लॉक' तुमची जन्मतारीख, फिटनेस दिनचर्या, धूम्रपान किंवा अल्कोहोलच्या सवयींसह विविध सिग्नल वापरून तुमच्या मृत्यूची तारीख सांगतो. तसेच त्याचे विश्लेषण करून तुमच्या मृत्यूची अचूक वेळ मोजतो. डेथ क्लॉक नावाची एक मोफत वेबसाइट तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख तसेच तुमचा मृत्यू कसा होईल हे सांगते.

हेही वाचा - Google Chrome वापरणाऱ्यांनो सावधान! भारत सरकारने दिलेल्या 'या' इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान  

नवीन एआय डेथ क्लॉक - 

आतापर्यंत 63 दशलक्षाहून अधिक लोकांनी या साइटला भेट दिली आहे आणि मृत्यूची तारीख आणि वेळ, ज्या दिवशी ते 'मरणार आहेत' ते समजून घेण्यासाठी या घड्याळाचा वापर केला आहे. अहवालांनुसार, हे डेथ क्लॉक बॉडी मास इंडेक्स, जन्मतारीख, अल्कोहोल आणि धूम्रपान सेवन, फिटनेस, आहार आणि देश यासह विविध घटकांचा वापर करून तास, मिनिटे आणि सेकंदांपर्यंत तुमच्या मृत्यूची तारीख सांगण्याचा दावा करते. 

हेही वाचा गुगलवर चुकूनही 'या' 4 गोष्टी सर्च करू नका; अन्यथा खावी लागू शकते जेलची हवा

एआय डेथ क्लॉकवर मृत्यूची तारीख आणि वेळही समजते - 

ही साइट वापरकर्त्यांच्या मृत्यूचे कारण आणि मृत्यूची तारीख आणि वेळ देखील सांगते. यासोबतच, वेबसाइटवर एक डिस्क्लेमर देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मृत्यू घड्याळ फक्त मनोरंजनासाठी वापरावे कारण हे कॅल्क्युलेटर तुमच्या मृत्यूची खरी तारीख सांगू शकत नाही. यामुळे मृत्यूची तारीख अचूकपणे अंदाज लावता येईल, अशी शक्यता कमी आहे. जर तुम्हाला 'अधिक काळ जगायचे' असेल तर शरीराला योग्य सवयी लावणे आवश्यक आहे.