आता UPI किंवा कॅशची चिंता मिटली! दुबईतील मॉलमध्ये फक्त चेहरा दाखवून पेमेंट करण्याची सुविधा
दुबई: भारतीय पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सध्या, यूएई आणि इतर आखाती देशांमध्ये बरेच भारतीय पर्यटक राहतात. अनेक पर्यटक सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये पर्यटनासाठी जातात. आता पर्यटकांना दुबई मॉलमध्ये पेमेंट करणे अत्यंत सोपे होणार आहे. आता चेहरा स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता.
हेही वाचा - भारतात प्रवेश करण्यास Starlink सज्ज! 840 पेक्षा कमी किमतीत अमर्यादित सॅटेलाइट डेटा मिळणार
खालील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की हा दुबईतील एक मॉल आहे, जिथे पेमेंट करण्यासाठी रोख रक्कम, कार्ड किंवा UPI ची आवश्यकता नाही. येथे पेमेंट फक्त चेहऱ्याच्या ओळखीद्वारे केले जाते. यासाठी तुम्हाला केवळ पेमेंट मशीनसमोर उभे राहावे लागेल. त्यानंतर मशीन तुमचा चेहरा ओळखेल आणि जे काही पेमेंट केले जाईल ते तुमच्या बँकेतून कापले जाईल.
हेही वाचा - Paytm, GPay, PhonePe वापरकर्त्यांना मिळाले नवीन अपडेट! ऑनलाइन फसवणुकीला बसणार आळा
जागतिक व्यासपीठावर UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NPCI इंटरनॅशनल एकत्र काम करत आहेत. आता दुबई मॉल्समध्ये पेमेंट करणे आणखी सोपे झाले आहे. सध्या, फेस पेमेंट फक्त दुबई मॉलमध्ये लागू आहे. सध्या, भारताबाहेर, नेपाळ, श्रीलंका, मॉरिशस, यूएई, सिंगापूर, फ्रान्स आणि भूतानमध्ये फक्त UPI (QR कोड) द्वारे पेमेंट केले जाते.