Pan Card Fake Loan: तुमच्या नावावर कुणी फसवे लोन तर घेतले नाही ना? जाणून घ्या तपासण्याची पद्धत
Pan Card Fake Loan: आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, गुंतवणूकरणे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी पॅन नंबर आवश्यक ठरतो. पण याच पॅन कार्डचा गैरवापर होऊन अनेक लोक बनावट कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. घोटाळेबाज लोक तुमची माहिती चोरून तुमच्या नावाने फसवे लोन घेतात आणि त्याचा फटका थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरला बसतो.
फेक लोन म्हणजे काय?
काही आर्थिक संस्थांकडून किंवा अॅप्सद्वारे केवळ पॅन कार्ड नंबर आणि त्याच्या स्कॅन कॉपीच्या आधारे कर्ज दिले जाते. जर ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेली, तर तुमच्या नावाने कुणीतरी कर्ज घेऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला काहीच माहिती नसतानाही तुमच्यावर कर्जाची थकबाकी दाखवली जाते. हेही वाचा: Ethanol Blend Fuel : E20 पेट्रोल तुमच्या कारचे नुकसान करते का? मायलेज आणि इंजिनवर काय परिणाम होतो?
याचा धोका किती मोठा?
अनेकांना हे कळतसुद्धा नाही की त्यांच्या नावावर कर्ज चालू आहे. बँकेकडून नवीन कर्ज नाकारले गेले किंवा क्रेडिट स्कोअर अचानक घसरला, तेव्हाच फसवणूक उघडकीस येते. परिणामी आर्थिक संकट, कायदेशीर अडचणी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
आपल्या नावावर बनावट कर्ज आहे का हे कसे तपासावे?
यासाठी क्रेडिट रिपोर्ट तपासणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. भारतात सिबिल (CIBIL), इक्विफॅक्स (Equifax), एक्सपेरियन (Experian) आणि सीआरआयएफ हायमार्क (CRIF Highmark) या क्रेडिट ब्युरो कंपन्या कार्यरत आहेत. या संस्थांकडून तुमच्या नावावर घेतलेले सर्व कर्ज, क्रेडिट कार्ड व परतफेडीची माहिती उपलब्ध करून दिली जाते. हेही वाचा: iPhone 17 Series Price: नव्या GST दरानंतर पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या आयफोन 17 ची किंमत किती असेल?
तपासणीसाठी पायऱ्या अशा आहेत:
-
संबंधित क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटला भेट द्या
-
तुमचा पॅन नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरा
-
ओटीपीद्वारे पडताळणी करा
-
लगेच तुमचा क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड होईल
-
रिपोर्टमध्ये जर एखादे कर्ज दिसले जे तुम्ही कधी घेतलेच नाही, तर ती फसवणूक असल्याचे स्पष्ट होते
बनावट कर्ज आढळल्यास काय करावे?
-
सर्वप्रथम त्या बँकेशी किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधा आणि प्रकरण मांडून द्या
-
क्रेडिट ब्युरोकडे वाद नोंदवा, बहुतेक वेबसाइटवर ऑनलाइन तक्रारीचा पर्याय उपलब्ध आहे
-
तुमचे ओळखपत्र, कर्जाचे तपशील आणि एक प्रतिज्ञापत्र सादर करा
-
जवळच्या सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार द्या किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवा
पॅन कार्ड ही आर्थिक सुरक्षेची किल्ली आहे. पण ती जर चुकीच्या हातात गेली, तर आयुष्यभराचा त्रास ओढवू शकतो. म्हणूनच वेळोवेळी आपला क्रेडिट रिपोर्ट तपासणे आणि वैयक्तिक माहिती जपून ठेवणे गरजेचे आहे. सावध राहणे हेच फसवणुकीपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.