'कदाचित माझे मूल कॉलेजमध्ये जाणार नाही!' असं का म्हणाले ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन?
What Does OpenAI CEO Say About Education? : चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी भविष्यकाळातील शिक्षणाबद्दल असे काही म्हटले आहे, जे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्यांनी शिक्षणाच्या भविष्याबद्दल बोलताना असे मत दिले आहे की, कदाचित त्यांचे स्वतःचे मूल महाविद्यालयात जाणार नाही. त्यांची ही गोष्ट लोकांना आश्चर्यचकित करणारी आणि पुढील काळातील मोठ्या बदलांकडे संकेत करणारी आहे.
हल्ली बहुतेक पालकांना त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, असे वाटते. त्यासाठी चांगल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आपल्या मुलाला शिकता यावे, यासाठी पालक धडपडत असतात. त्याच वेळी, ओपनएआयचे सीईओ त्यांचे स्वतःचे मूल कदाचित महाविद्यालयात जाणार नाही, असे म्हणत आहेत. ही बाब सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. तसेच, मुलांचे आणि शिक्षणाचे भविष्य काय असेल, याची चिंताही वाटू शकते.
सॅम ऑल्टमन यांनी म्हटले आहे की, एआय शिक्षणात बदल घडवून आणेल. हा बदल कदाचित 18 वर्षांत येईल. यासोबतच, त्यांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा नवीन पिढी एआयशिवाय जग ओळखणार नाही, तेव्हा शिक्षण खूप वेगळे दिसेल. चला, याबदद्ल अधिक जाणून घेऊया.
हेही वाचा - AI तुमच्या बँक बॅलन्सवर लक्ष ठेवून आहे? आवाजाची नक्कल करून फसवणूक करू शकते, सॅम ऑल्टमन यांचा इशारा
ओपनएआयच्या सीईओंनी एआय बद्दल काय सांगितले? मागील आठवड्याच्या शेवटी विनोदी कलाकार थियो वॉन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये ओपनएआयचे सीईओ म्हणाले की, एआय शिक्षण संपवणार नाही. तर, ते शिक्षणाला आणखी विकसित करेल. ऑल्टमन म्हणतात की, भावी पिढ्या (त्याच्या स्वतःच्या मुलांसह) अशा वास्तवात वाढतील, जिथे ते कधीही एआयपेक्षा हुशार असणार नाहीत. त्यांना अशा जगाची कधीच माहिती नसेल, जिथे उत्पादने आणि सेवा त्यांच्यापेक्षा चांगल्या नसतील. म्हणजेच, या जगातील सर्व गोष्टी अगदी उच्च दर्जाच्या असल्याचे या मुलांना पाहायला मिळेल. ऑल्टमन म्हणाले की, त्या जगात शिक्षण खूप वेगळे वाटणार आहे. ऑल्टमन यांना आधीपासूनच असे वाटते की, बहुतेक लोकांसाठी शाळा-कॉलेज कदाचित फारसे चांगले काम करत नाहीत. परंतु, त्यांना वाटते की, जर तुम्ही 18 वर्षे पुढे गेलात तर, खूप वेगळ्या गोष्टी दिसतील.
याबद्दल चिंता व्यक्त केली याशिवाय, ऑल्टमनने मुलांवर तंत्रज्ञानाच्या परिणामाबद्दल देखील खोल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विशेषतः लघु-फॉर्म व्हिडिओंमधून (Short Video) त्यांना मिळणाऱ्या डोपामाइन हिटबद्दल बोलले आहे. कारण, शॉर्ट व्हिडिओ सतत पाहत राहावेसे वाटतात. त्यात गुंतून पडल्यानंतर किती वेळ जातो, ते कळत नाही. मात्र, तरीही ऑल्टमन यांच्या चिंता लहान मुले आणि तरुणांसाठी नाहीत तर, प्रौढांसाठी आहेत. एआयला पुढे नेण्याचे खरे आव्हान म्हणजे जुनी पिढी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकते का आणि ते समजून घेऊ शकते का, हे आहे, असे त्यांना वाटते.
मुलांचे ठीक आहे, पण खरी चिंता त्यांच्या पालकांची वाटतेय ऑल्टमन म्हणाले की, मुलांचे ठीक आहे. त्यांच्यापेक्षा त्यांना पालकांची काळजी जास्त आहे. ते पुढे स्पष्ट करतात की, जर तुम्ही जगाच्या इतिहासाकडे पाहिले तर, जेव्हा एखादी नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा जे लोक त्या तंत्रज्ञानासोबत लहानाचे मोठे होतात, ते नेहमीच त्यात तरबेज असतात. म्हणजेच, त्यांना ते चांगले समजते. ते नेहमीच काय करायचे हे ठरवतात. परंतु, जर तुम्ही 50 वर्षांचे असाल आणि तुम्ही तुमच्या काळात गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने केलेल्या किंवा शिकलेल्या असतील, तर त्या नेहमीच उपयुक्त ठरतील, असे नाही. त्यांच्या या शब्दांनंतर, त्याचा परिणाम लोकांवरही दिसून येतो. यावर उदाहरण देताना ते म्हणाले, आपल्या पिढीतील सर्वजण कॉम्प्युटरसोबत लहानाचे मोठे झाले. त्यात आपण सर्व काही सहजतेने करू शकतो. मात्र, आपल्या पालकांकडे पाहिले, तर ते याच गोष्टी तितक्या सफाईदारपणे करू शकत नाहीत. शेवटी, आपल्यालाही एआयची भीती वाटते, असे ऑल्टमन यांनी कबूल केले.
हेही वाचा - Microsoft Report : प्रथम 'या' क्षेत्रातल्या नोकऱ्या AI च्या तडाख्यात; पण सध्या काही नोकऱ्या सुरक्षित!