हुष्कर मद्दुरम्मा देवी यात्रा उत्सवादरम्यान एक भया

धार्मिक कार्यक्रमादरम्यान 100 फूट उंच रथ कोसळला; दोघांचा मृत्यू, कुठे घडली घटना? जाणून घ्या

100 Feet High Chariot Collapses

100 Feet High Chariot Collapses: कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये हुष्कर मद्दुरम्मा देवी यात्रा उत्सवादरम्यान एक भयानक घटना घडली. येथे 100 फूट उंच रथ गर्दीवर कोसळला, ज्यामध्ये चिरडल्यामुळे दोन लोकांचा वेदनादायक मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मंदिराजवळ घडली, जिथे मोठ्या संख्येने लोक उत्सवासाठी जमले होते. बेंगळुरू ग्रामीण पोलिस अधीक्षक (एसपी) सीके बाबा यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता घडली. बेंगळुरू ग्रामीणमधील एका उत्सवादरम्यान 100 फूट उंचीचा रथ कोसळला. या दुर्घटनेत दोन व्यक्तीचा मृत्यू झाला. 

देवीच्या यात्रेदरम्यान घडली घटना - 

प्राप्त माहितीनुसार, कर्नाटकातील अनेकल येथे वार्षिक हुष्कर मद्दुरम्मा देवी यात्रा महोत्सवादरम्यान ही भयानक घटना घडली. उत्सवादरम्यान निघालेला 100 फूट उंच रथ अचानक भाविकांवर कोसळला आणि त्यात अनेक लोक चिरडले गेले. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले.

हेही वाचा - थडथड भांडी पडण्याचा आवाज आला.. पाहते तर काय.. स्वयंपाकघरात होता विषारी साप; मग या महिलेनं काय केलं पाहा..

बेंगळुरूमधील अनेकलजवळील होसूर येथील एका गावातील मेळ्यात मद्दुरम्मा देवी जत्रे दरम्यान देवीची मूर्ती घेऊन जाणारा 100 फूट लांबीचा रथ गर्दीवर कोसळला. भाविक हा रथ ओढत होते, तेव्हा एका ठिकाणी हा 100 फूट उंच रथ लोकांवर पडला. रथ कोसळला तेव्हा त्यावर स्वार झालेल्या आणि जवळून चालणाऱ्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. या अपघातात तामिळनाडूचा 26 वर्षीय ऑटो चालक रोहित आणि बंगळुरूची 14 वर्षीय फुले विक्रेती ज्योती यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - श्रद्धेत असीम ताकद असते! आईची प्रार्थना देवाने ऐकली अन् मुलाचा काळ मागे फिरवला, Video Viral

रथ पडताना पाहून लोक पळू लागले - 

रथ पडताना पाहून सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळू लागले. रथ कोसळल्यानंतर एका कंपाउंडच्या भिंतीवर पडला. त्यामुळे दोन गाड्यांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जास्त जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. खराब हवामानामुळे प्रशासनाला मदतकार्य करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.