170 तास भरतनाट्यम सादरीकरण! मंगळुरूच्या युवतीची 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद
मंगळुरू: कर्नाटकातील मंगळुरू येथील सेंट अलॉयसियस येथे कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी रेमोना एव्हेट परेरा हिने 170 तास सतत भरतनाट्यम सादर करून उल्लेखनीय जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. प्रेक्षकांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन दोन्ही माध्यमांतून तिच्या परिश्रमाचे भरभरून कौतुक केले.
रेमोनाने 21 जुलै ते 28 जुलैदरम्यान हे सादरीकरण केले. रेमोना ही भारतीय शास्त्रीय नृत्य इतक्या तासांपर्यंत अविरत सादर करणारी पहिली कलाकार ठरली आहे. कॉलेजमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिला प्रत्येक तासाला 15 मिनिटांचा अल्प विश्रांती वेळ देण्यात आला होता. कॉलेजचे रंगा अध्ययन केंद्राचे संचालक क्रिस्टोफर डिसोझा यांनी सांगितले की, तिने इतिहास घडवला आहे. तिची चिकाटी आणि समर्पण नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे.
हेही वाचा - भूकंपाच्या हादऱ्यांनाही हरवता आलं नाही डॉक्टरांचं धैर्य! रशियन डॉक्टरांचा धाडसी व्हिडिओ व्हायरल
रेमोना हिने वयाच्या तीसऱ्या वर्षी प्रसिद्ध गुरु श्रीविद्या मुरलीधर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये तिने एकल सादरीकरणाचे पदार्पण केले. आज रेमोना जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय नृत्याची मान उंचावणारी कलाकार ठरली आहे.
हेही वाचा - बाप रे!! एक नाही, दोन नाही…थेट 19 साप दिसले एकत्र; व्हिडिओ पाहून व्हाल अवाक्
दरम्यान, सोशल मीडिया नेटीझन्सनी परेराच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिच्या या विक्रमावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे, 'वाह, तिच्यात किती दृढनिश्चय आणि आंतरिक शक्ती आहे! तिला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!' दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'रेमोनाआने इतिहास रचला आहे... तिच्या आई आणि तिच्या नृत्य गुरुच्या ताकदीने आज विजय मिळवला.' तथापी, तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, 'मी सात दिवस झोपेशिवाय एकाच ठिकाणी बसण्याची कल्पनाही करू शकत नाही, आणि तिने 170 तास झोपेशिवाय सतत सादरीकरण केले. हे कल्पने पलिकडचे आहे. मंगलोरच्या कन्येचे खूप खूप अभिनंदन... हॅट्स ऑफ.'