नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून खाली पडून अवघ्या 4

नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, पहा व्हिडिओ

Toddler dies after falling from 12th floor in Naigaon

नायगाव: पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व भागातून एक अत्यंत हृदयद्रावक12 व्या मजल्यावरून खाली पडून अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. अन्विका प्रजापती, असं या मृत मुलीचं नाव आहे.  घटना समोर आली आहे. नवकार इमारतीच्या ही घटना मंगळवारी 22 जुलै रोजी रात्री 8 वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अन्विकाची आई तिला घराबाहेर चप्पल ठेवण्यासाठी घेऊन आली होती. यावेळी खेळता खेळता ती बाल्कनीतील लाकडी चप्पल स्टँडवर चढली आणि खिडकीजवळ गेली. बाल्कनीत कोणताही सुरक्षा ग्रिल नसल्याने अन्विकाचा अचानक तोल गेला आणि ती थेट 12 व्या मजल्यावरून खाली पडली. सुरक्षेतील ही भयानक चूक सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या हृदयद्रावक घटनेचा व्हडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - अजब स्टंट! चालत्या गाडीच्या बोनेटवर महिलेने केला ऑरा फार्मिंग डान्स

नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून पडून चिमुकली मृत्यू - 

हेही वाचा - दोन बल्ब, पण बिल थेट 77 हजार! चंद्रपूरमधील कुटुंबाला विजबिलाचा जबर झटका

घटनेनंतर तिला तत्काळ वसईच्या सर डी. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नायगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सदर प्रकरणात निष्काळजीपणा, सुरक्षेतील त्रुटी आणि अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.