अहान पांडेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व

Ahaan Panday Video: अहान पांडेने खाल्ला 'विंचू'! नेटीझन्स म्हणाले, 'यापुढे तुझा एकही चित्रपट पाहणार नाही'

Ahaan Pandey ate a scorpion

Ahaan Panday Viral Video: प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. या चित्रपटात अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे याने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. 'सैयारा' चित्रपटात नवोदित जोड्या पाहायला मिळाल्या असून अहान पांडेने आपल्या पहिल्याच चित्रपटात दमदार कामगिरी करत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्याच्या अभिनयाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘सैयारा’ने केवळ भरघोस कमाईच केली नाही तर यंदाच्या अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्डही मोडीत काढले. सैयारामुळे तरुणांमध्ये अहानची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढत आहे.

अहान पांडेने थायलंडमध्ये खाल्ला 'विंचू' - 

दरम्यान, अहान पांडेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो थायलंडच्या स्ट्रीट फूड मार्केटमध्ये तळलेले ‘विंचू’ खाताना दिसत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  

हेही वाचा - 15 ऑगस्टला मिळेल फुल एंटरटेनमेंट! थिएटरसह ओटीटीवर नवीन चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित

अहान पांडे सोशल मीडियावर ट्रोल्स - 

एका बाजूला काही युजर्सने त्याला संस्कृती विरोधी ठरवत ट्रोल केले आहे. तर काहीजणांनी त्याच्यावर टीका केली आहे. एका यूजरने 'आता याचा चित्रपट पाहणार नाही,' असंही म्हटलं आहे. तसेच दुसरीकडे, अनेकांनी त्याचं समर्थन करत म्हटलं आहे की, 'खाण्याच्या सवयी ही वैयक्तिक आवडीची बाब आहे आणि यामध्ये इतकी टीका करणे योग्य नाही.' तथापी, आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'जग फिरणे म्हणजे नवीन गोष्टींचा प्रयत्न करणे. यात काय चूक आहे?' 

हेही वाचा - सारा तेंडुलकर बनली ऑस्ट्रेलियाची पर्यटन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

कोण आहे अहान पांडे? 

अहान पांडे हा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. अहान पांडे 27 वर्षांचा आहे. तो उद्योगपती चिक्की पांडेचा मुलगा आहे. अहानच्या आई एक फिटनेस तज्ञ आणि लेखिका आहे. अहान पांडेने ‘फ्रीकी अली’, ‘रॉक ऑन 2’ आणि ‘द रेल्वे मॅन’ या वेब सिरीजमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अहानने ‘फिफ्टी’ आणि ‘जॉलीवूड’ यांसारख्या लघुपटांत लेखक आणि अभिनेता म्हणूनही काम केलं आहे.