Viral Video: रस्त्यावरच टॉवेल गुंडाळून मॉडेलची अंघोळ,गर्दीसमोरच बदलले कपडे; धक्कादायक कृत्यावर नेटकरी थक्क!
सोशल मीडियावर सध्या एक अविश्वसनीय व्हिडीओ प्रचंड गाजत आहे, ज्यात एका प्रसिद्ध मॉडेलने थेट रस्त्यावर आंघोळ करण्याचा धक्कादायक प्रयोग केला आहे. प्रसिद्धीच्या शर्यतीत कुणी किती टोकाची मजल जाऊ शकतो, याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल. या मॉडेलने फक्त टॉवेल गुंडाळून रस्त्यावरच केस धुणे, साबण लावणे यासारख्या गोष्टी केल्या, ज्यामुळे तिथे गर्दी गोळा झाली. लोकांना सुरुवातीला हा प्रकार कशासाठी चालला आहे, हेच समजत नव्हते. पण जसजसे क्षण पुढे सरकले, तसतसे लोक अधिकच चकित होत गेले. काहींनी हा स्टंट मनोरंजक मानला, तर काहींनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
हा प्रकार पाहून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मॉडेलने आंघोळ पूर्ण केल्यानंतर सरळ रस्त्यावरच मेकअप करायला सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी असे काहीतरी घडताना पाहणे अनेकांसाठी धक्कादायक होते. तिने उभ्या असलेल्या लोकांकडून मदत घेतली कोणाला शॅम्पूने भरलेल्या केसांवर बॉटलने पाणी ओतायला सांगते तर कुणाकडून कानातले घालून घेतले, गाडीच्या आरशात पाहून आपला लूक पूर्ण केला आणि नंतर सर्वात मोठा धक्का दिला. टॉवेल सरकवताच उपस्थितांची नजर थबकली, क्षणभरासाठी कोणीही काही समजण्याच्या अवस्थेत नव्हते. पण लगेचच समजले की, टॉवेलच्या आत तिने मिनी ड्रेस आधीच घातलेला होता.
हा प्रकार काही जणांसाठी फक्त एक मनोरंजनाचा भाग वाटला, तर काहींनी यावर टीका केली. अशा प्रकारच्या कृती सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्या जातात, असे अनेकांचे म्हणणे आहे. काही लोकांना हे साहस थक्क करणारे वाटले, तर काहींनी यावर हसण्यावारी नेले.