या हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्

इस्रायलचा सीरियावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी टीव्ही अँकरने स्टुडिओतून काढला पळ

TV anchor flees studio to save his life

Syria Israel Conflict: इस्रायलने सीरियामधील दमास्कस शहरावर जोरदार हवाई बॉम्बहल्ला केला असून या हल्ल्यात सीरियन संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक टीव्ही अँकर लाईव्ह सादरीकरण करत असताना स्टुडिओतून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना दिसत आहे.

स्टुडिओमध्ये ऐकू आला स्फोटांचा आवाज - 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की अँकर लाईव्ह रिपोर्ट करत असताना अचानक मागे स्फोट होता. या स्फोटोचे प्रतिध्वनी स्टुडिओमध्येही ऐकू येतात, ज्यानंतर अँकरने लगेच स्टुडिओमधून पळ काढते. दमास्कसवर झालेल्या या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी तणाव अधिक तीव्र झाला आहे. टीव्ही अँकरचा व्हायरल व्हिडीओ येथील युद्धजन्य परिस्थितीचे भीषण वास्तव अधोरेखित करतो.

इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा इशारा

इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हल्ल्यानंतर म्हटले की, 'दमास्कसमधील इशारे संपले आहेत, आता वेदनादायक हल्ले होतील. इस्रायली सैन्य सुवेदामध्ये लष्करी कारवाई सुरू ठेवेल.' ही हल्ल्याची सलग तिसरी घटना असून इस्रायलने दक्षिण सीरियातील सुवेदा प्रदेशात लष्करी हस्तक्षेप सुरू ठेवला आहे. या भागात सीरियन सैन्य आणि दारुस समुदायातील गटांमध्ये युद्धबंदी मोडल्याने संघर्ष सुरू झाला आहे.

हेही वाचा - इराणला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! भारतीय दूतावासाने जारी केला इशारा

नेतान्याहूंचा स्पष्ट संदेश - 

दरम्यान, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, इस्रायल सीमेवरील नैऋत्य सीरिया क्षेत्राला निशस्त्रीकरण क्षेत्र म्हणून कायम ठेवण्यास वचनबद्ध आहे. तसेच दारुस लोकांचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे.

हेही वाचा - पाकिस्तान एअरलाईन्सचा कारनामा..! कराचीच्या तिकिटात सऊदी अरबला पोहोचवलं..!

दारुस धार्मिक पंथ - 

दारुस हा एक धार्मिक पंथ आहे, ज्याचा उगम 10 व्या शतकात झाला. हे लोक शिया इस्लामच्या इस्माईली पंथाचे अनुयायी आहेत. जगभरात सुमारे 10 लाख दारुस समुदायाचे सदस्य आहेत, त्यापैकी बहुतांश सीरियात, तसेच लेबनॉन आणि इस्रायलमध्ये राहतात.